Sunday, June 23, 2024

कोणासोबत राहतात अभिनेते दिलीप प्रभावळकर? जाणून घ्या ‘पछाडलेला’मधील इनामदार भुसनाळेच्या कुटूंबाबद्दल

मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे एक नावाजलेले कलाकार आहे. त्यांच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर आजही कायम आहे. त्यांनी अनेक मालिका आणि चित्रपटात अजरामर पात्र निभावली आहेत. त्यांच्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्यांनी ऑनस्क्रीन जेवढ्या तापट आणि रागीट भूमिका साकारल्या आहेत तेवढेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते शांत आहेत. वयाच्या 79 व्या वर्षी देखील एखाद्या तरुण कलाकाराला लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे. तेवढ्या जोमाने ते काम करतात. या वयात देखील काम करून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबाबत सगळ्यांना माहित आहे, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खूप कमी लोकांना माहिती असेल.

अभिनय क्षेत्रात येण्याआधी दिलीप प्रभावळकर हे एका औषध कंपनीत मोठ्या पदावर नोकरीला होते. नोकरी करता करता त्यांनी त्यांची अभिनयाची आवड जोपासली आणि रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पत्नीचे नाव नीला प्रभावळकर हे आहे. त्या चंदेरी दुनिया आणि सोशल मीडियापासून फार दूर आहेत. नीला आणि दिलीप प्रभावळकर यांना एक मुलगा आहे. त्यांच्या मुलाचे नाव केदार प्रभावळकर हे आहे. वडील अभिनय क्षेत्रात असूनही केदारने अभिनय क्षेत्र न निवडता वेगळे क्षेत्र निवडले आहे. (ets know abaut marathi actor dilip prabhavalkar’s personal life)

केदारला अभिनयात अजिबात रस नाहीये. 17 डिसेंबर 2013 साली केदारने सोनल अलवारसोबत लग्न केले. त्यांच्या लग्नात अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ते दोघेही पर्यावरण मॅनेजमेंट क्षेत्राशी जोडलेले आहेत. दिलीप प्रभावळकर यांच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास, त्यांनी अनेक चित्रपटात तसेच मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी ‘झपाटलेला’, ‘नारबाची वाडी’, ‘बोक्या सातबंडे’, ‘पछाडलेला’, ‘फॅमिली कट्टा’, ‘चौकात राजा’, ‘पोस्टर बॉईज’, ‘पिंपळ’, ‘फास्टर फेणे’, ‘लगे राहो मुन्नाभाई’, ‘एक डाव भुताचा’, ‘शाळा’, ‘स्लॅमबूक’, ‘आप्पा आणि आप्पा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

अधिक वाचा- 
सर्जनशील भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांच्या कुटुंबाविषयी ‘या’ गोष्टी माहित आहेत का?
लोकांच्या घरात झाडू मारण्याचे काम करणाऱ्या शशिकला, नकारात्मक भूमिका साकारून बनल्या आघाडीच्या अभिनेत्री

हे देखील वाचा