Saturday, April 20, 2024

‘बिग बॉस मराठी’चा विनर विशाल निकमबाबत ‘या’ खास गोष्टी माहित आहेत का? एकदा नजर टाका

बिग बॉस मराठी‘चे तिसरे पर्व चांगलेच गाजले. बिग बॉसच्या घरात एकूण १४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. नंतर दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री झाल्या. या १६ माणसांच्या दुनियेत कोण शेवटपर्यंत कोण टिकेल याची सगळ्यांना ओढ लागली होती. अशातच रविवारी (२६ डिसेंबर ) रोजी या शोचा ग्रँड फिनाले झाला आहे. बिग बॉसच्या या पर्वात विशाल निकम जिंकला आहे.

त्यामुळे सोशल मीडियावर त्याचा बोलबाला चालला आहे. विशाल निकमने सुरुवातीपासूनच सगळ्यांच्या मनात त्याचे असे एक खास स्थान निर्माण केली आहे. त्याचा खेळ, स्वभाव, भावना या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना खूप आवडल्या. सोशल मीडियावर त्याला खूप मोठा पाठिंबा मिळाला याचेच फळ म्हणजे त्याला मिळालेली बिग बॉस मराठीची ट्रॉफी. त्याचे सगळे चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत. चला तर जाणून घेऊया विशालबाबत काही महत्वाच्या गोष्टी… (lets know about bigg boss marathi 3 winner vishal nikam)

विशाल निकम याचा जन्म १० फेब्रुवारी १९९४ मध्ये पुण्यात झाला आहे. त्याचे शालेय शिक्षण त्याच्या गावी खानापूर सांगलीला झाले. तसेच महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील बाबुरावजी घोलप या महाविद्यालयात झाले. त्याने एमएस्सीमध्ये त्याचे पोस्ट ग्रँज्युएशन झाले. विशालला लहान असल्यापासूनच आर्मीमध्ये जाण्याची इच्छा होती. परंतु नंतर त्याला समजले की, त्याची आवड अभिनयात आहे. त्यामुळे त्याने त्याच्या करिअरची गाडी अभिनयाकडे वळवली. त्याने अनेक मालिका, चित्रपट, वेबसिरीजमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

त्याने २००८ साली ‘मिथुन’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्याने ‘धुमस’ या चित्रपटात काम केले. त्याने ‘साता जन्माच्या गाठी’, ‘जय भवानी जय शिवाजी’ तसेच ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकांमध्ये काम केले आहे. जोतिबा या मालिकेने तो घराघरात पोहचला आणि त्याला सर्वत्र ओळख मिळाली. तसेच तो ‘द स्निपर्स’ या वेबसीरीजमध्ये देखील मुख्य भूमिकेत होता.

बिग बॉसच्या घरात आल्यापासूनच त्याच्यातील ते टॅलेंट दिसत होते. त्याने नेहमीच कोणताही विचार न करता त्याच्या टीमला पाठिंबा दिला. तो ‘तिकीट टू फिनाले’मधून तिकीट मिळवून पहिला फायनॅलिस्ट झाला होता. टॉप २ मध्ये त्याच्यासोबत जय दुधाने होता. यावेळी महेश मांजरेकर यांनी विशालला या पर्वाचा विजेता घोषित केले.

हेही वाचा :

अनेक महिन्यांनी शेहनाज गिल दिसली मस्तीच्या मूडमध्ये, मित्राच्या साखरपुड्याच्या केला ‘झिंगाट’ डान्स

‘सगळं तुमच्यामुळे शक्य झालं,’ म्हणत बिग बॉस मराठीचा उपविजेता जय दुधानेने मानले चाहत्यांचे आभार

सोनाली पाटीलने केला ‘बुरुम बुरुम’ ट्रेंड फॉलो, कॅप्शनने वेधले चाहत्यांचे लक्ष 

 

 

 

हे देखील वाचा