अनेक महिन्यांनी शेहनाज गिल दिसली मस्तीच्या मूडमध्ये, मित्राच्या साखरपुड्याच्या केला ‘झिंगाट’ डान्स


बिग बॉसनंतर शेहनाज गिल हे नाव सर्वांच्याच परिचयाचे झाले. शेहनाज आणि सिद्धार्थ शुक्ला यांचे नाते तर नेहमीच चर्चेचा विषय होते. सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक झालेल्या निधनानंतर तर शेहनाज पूर्णपणे तुटली होती. संपूर्ण जगाशी काही काळ तिने संपर्क तोडून टाकला होता. मात्र आता हळूहळू शेहनाज तिच्या दैनंदिन जीवनाकडे परतत असून, तिला तिच्या कामामध्ये व्यस्त झालेले पाहून तिचे फॅन्स देखील खूप खुश झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच तिचा एक पंजाबी सिनेमा देखील प्रदर्शित झाला, त्याच्या प्रमोशनवेळी शेहनाज बऱ्याच काळानंतर कॅमेऱ्यांसमोर आली होती. आता सिद्धार्थच्या निधनानंतर पहिल्यांदाच शेहनाज इतकी आनंदी आणि मस्तीच्या मूडमध्ये दिसली आहे. एका मित्राच्या साखरपुड्यादरम्यान शेहनाज दिसली यावेळी तिने डान्स करत खूप मस्ती देखील या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शेहनाज कलाकार मॅनेजर आणि निर्माता असलेल्या कौशलच्या साखरपुड्याच्या पोहचली होती. या कार्यक्रमात तिने ‘झिंगाट’ गाण्यावर दमदार डान्स करत खूप धमाल केली. तिच्या या डान्सचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. या वेळी शेहनाजने काळ्या रंगाचा शिमरी कॉकटेल ड्रेस घातला होता, ज्यात ती कमाल दिसत होती. या साखरपुड्याला इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. ज्यात कश्मिरा शाह, मोनालिसा, पारितोष त्रिपाठी, विक्रांत सिंग आदी उपस्थित होते.

शेहनाज यावेळी खूपच खुश आणि आनंदी दिसली. तिच्या असलेला बबलीनेस देखील बऱ्याच काळाने सर्वांना पाहायला मिळाला. तिला खुश पाहून तिच्या फॅन्सला देखील आनंद झाला असेल. काही दिवसांपूर्वीच शेहनाजने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘लुसिफर’ या हॉलिवूड सिरीजचे एक पोस्टर शेअर केले होते, ज्यात ती हॉलिवूड अभिनेता टॉम एलिससोबत दिसली. यावरून अनेकांना वाटले की ती वेबसिरीजमध्ये पदार्पण करत आहे, मात्र नंतर खुलासा झाला की, हा एक प्रोमोशनल व्हिडिओ होता.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!