Friday, July 5, 2024

Liger | नवीन पोस्टरमध्ये पाहायला मिळाली विजय- अनन्यामध्ये जबरदस्त केमिस्ट्री, ‘या’ दिवशी रिलीझ होणार पहिलं गाणं

‘लायगर’ चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलीझ झाले आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) मुख्य भूमिकेत आहेत. विजय या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनवला जात आहे. ज्याला रिलीझ व्हायला अजून ५० दिवस बाकी आहेत. तसेच करण जोहरने चित्रपटाच्या पहिल्या गाण्याची रिलीझ डेटही जाहीर केली आहे.

करण जोहरने इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्टर जारी केले आहे. यासोबतच चित्रपटाशी संबंधित काही महत्त्वाची माहितीही प्रेक्षकांसमोर आणली आहे. ‘लायगर’चे नवीन पोस्टर शेअर करताना करणने लिहिले, “५० दिवसांनंतर तुमच्यासमोर काय सादर होणार आहे त्याची आणखी एक सुंदर झलक पाहा… चला ग्लोबल म्युझिकसोबत सेलिब्रेट करूया.” यानंतर करणने खाली कॅप्शनमध्ये लिहिले की, “अकडी-पकडी हे चित्रपटाचे पहिले गाणे ११ जुलै रोजी रिलीझ होणार आहे. याआधी ८ जुलैला या गाण्याचा प्रोमो पाहायला मिळेल.” (liger new poster released staring vijay deverakonda ananya panday)

Set featured image

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विजय आणि अनन्या पांडे यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. दोघे ‘अकडी-पकडी’ गाण्याच्या एका सीनमध्ये दिसत आहेत. पोस्टरमध्ये विजय अनन्याला बोटाने शिट्टी वाजवत असल्याचे दिसत आहे. साऊथ स्टार विजय देवरकोंडाचेही हिंदी सिनेसृष्टीत करोडो चाहते आहेत.

साऊथचे दिग्दर्शक पुरी जगन्नाध यांनी ‘लायगर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट यावर्षी २५ ऑगस्टला रिलीझ होणार आहे. जगातील दिग्गज बॉक्सर माईक टायसन देखील या चित्रपटात इतर स्टारकास्टमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा