टॉलीवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांमध्ये विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda)यांची गणना केली जाते. त्याचा लायगर हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्यामुळेच कलाकार या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतेच माध्यमाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलताना त्याने बॉलिवूडवर मनमोकळेपणाने भाष्य केले. एका बाजूला बाॅयकाॅट बाॅलिवूड हा ट्रेंड सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला स्टार्स आपल्या सिनेमांबद्दल चिंतेत आहेत. यातच विजयला शाहरुख खानची(Shah Rukh Khan) एक किमती गोष्ट चक्क चोरायची आहे.
शाहरुख खानकडून घेणार ही गोष्ट
विजय देवरकोंडानं (Vijay Deverakonda) माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय, त्याला शाहरुखची एक गोष्ट हवी आहे. ती म्हणजे शाहरुखचं किंग हे टायटल. अभिनेत्याला बाॅलिवूड किंग किंवा बादशहा म्हटलं जातं. तसं किंग विजयलाही स्वत:साठी हवंय.
सध्या फक्त लायगरवर लक्ष केंद्रित करणार
याशिवाय त्याला बॉलिवूडच्या आणखी ऑफर्स घेण्यात रस आहे का, असे विचारले असता? यावर अभिनेत्याने सांगितले की, त्याला चित्रपट साइन करण्याची घाई नाही. त्याला सध्या चित्रपटाचे प्रमोशन, लोकांना भेटणे, लोकांशी बोलणे, देशभ्रमण करणे आणि जेवणाचं आनंद घेणे आवडते. अभिनेता म्हणाला, ‘मी सध्या लायगरशिवाय काहीही पाहत नाही आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला की, त्यानंतरही मी पुढचा विचार करेन.
लायगरबद्दल सांगायचे तर, या चित्रपटात अमेरिकन बॉक्सर माइक टायसन कॅमिओमध्ये दिसणार आहे. या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. विजय व्यतिरिक्त रम्या कृष्णन, अनन्या पांडे, विशू रेड्डी, अली, मकरंद देशपांडे, रोनित रॉय हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय विजयच्या आगामी प्रोजेक्टबद्दल सांगायचे तर, तो रोमँटिक एंटरटेनरमध्ये देखील दिसणार आहे. ‘कुशी’ या चित्रपटानंतर त्याच्यासोबत सामंथा रुथ प्रभू दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कर
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशामुळे आमिर सोडणार भारत, पुढील आयुष्य घालवणार ‘या’ देशात?
‘कधीपर्यंत सहन करायचा अत्याचार?’, बिहारी विद्यार्थ्याच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच खेसारी लालची सटकली
क्या बात है! घटस्फोटानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले धनुष आणि ऐश्वर्या, खूपच खास आहे कारण