Monday, September 25, 2023

रंगभूमीपासून दयाबेनने केली अभिनयाला सुरुवात, शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटातही झळकली अभिनेत्री

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय टीव्ही शोची दयाबेन म्हणजेच दिशा वकानी(Disha vakani)आज (17 ऑगस्ट) रोजी तिचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. दिशा वकानी ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. पण, टीव्ही शोशिवाय तिने चित्रपटांमध्येही हात आजमावला आहे. मात्र 2008 पासून प्रसारित होत असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमधून तिला ओळख मिळाली. या शोमधील तिच्या दमदार अभिनयामुळे दिशाने प्रत्येक घराघरात खास ओळख निर्माण केली. तिचा निरागसपणा आणि अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. हेच कारण आहे की, दिशाने शो सोडल्यानंतरही प्रेक्षक तिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जाणून घेऊया तिच्याबद्दल…

दिशा वकानी ही मूळची गुजरातची. तिचा जन्म 17 ऑगस्ट 1978रोजी अहमदाबाद येथे गुजराती जैन कुटुंबात झाला. तिने गुजरात कॉलेजमधून ड्रॅमॅटिकमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. दिशाने गुजराती थिएटरमधून रंगमंचावर अभिनेत्री म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने टीव्ही मालिकांमध्ये काम केले. दिशा वकानीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’पूर्वी ‘शुभ मंगल सावधान’, ‘खिचडी’, ‘झटपट खिचडी’, ‘हीरो भक्ती ही शक्ती है’ आणि ‘आहट’ यांसारख्या टीव्ही शोमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे. याशिवाय ती 2014 साली ‘सीआयडी’मध्येही दिसली होती.

दिशा वकानीने मोठ्या पडद्यावरही आपले नशीब आजमावले आहे. ती शाहरुख खानच्या ‘देवदास’ चित्रपटात दिसली होती. याशिवाय दिशा ‘जोधा अकबर’, ‘मंगल पांडे द रायझिंग’, ‘लव्ह स्टोरी 2050’ सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली आहे. पण चित्रपटांमध्ये तिला फारशी ओळख मिळाली नाही. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो दिशाच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. मात्र, 2017 मध्ये तिने आई झाल्यानंतर या शोला अलविदा केला. तेव्हापासून त्याच्या या शोमध्ये पुनरागमनाची अटकळ होती.

माध्यमातील वृत्तानुसार, दिशा वकानी टीव्ही जगतातील सर्वात महागड्या स्टार्सपैकी एक आहे. तारक मेहता का उल्टा चष्माच्या एका एपिसोडसाठी ती जवळपास 1.5 लाख रुपये आकारायची. दिशा वकाणीच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर 2021च्या अहवालानुसार तिच्याकडे 37कोटींची संपत्ती आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर दिशाने 2015मध्ये मुंबईच्या सीए मयूर पडियासोबत लग्न केले. या जोडप्याला दोन मुले आहेत.

हेही वाचा-
संतापजनक! युक्रेनच्या गायिकेकडून तिरंग्याचा अपमान, लाईव्ह कॅान्सर्टमध्ये फेकला झेंडा; पुण्यात तक्रार दाखल
कातिल अदांनी लावलंय याड, मानसी नाईकने दाखवली हाॅट स्टाइल

 

हे देखील वाचा