गोड बातमी! ‘ही’ अभिनेत्री तिसऱ्यांदा होणार आई, अतिशय सुंदर पद्धतीने जाहीर केली बातमी


अभिनेत्री लिसा हेडन वयाच्या ३४ व्या वर्षी तिसऱ्यांदा आई होणार आहे. सोमवारी तिने इन्स्टाग्रामवर अतिशय सुंदर पद्धतीने ही गोड बातमी सर्वांसोबत शेयर केली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली. या व्हिडिओमध्ये लिसाने सांगितले की, त्यांचे बाळ येत्या जूनमध्ये जन्माला येणार आहे.

लिसाने या व्हिडिओत सांगितले की, ‘तिने केवळ आळसामुळे ही गुडन्यूज आधी सांगितली नाही.’ या व्हिडिओत लिसा हे सांगत असतानाच, तिचा मुलगा जॅक तिथे येतो आणि लिसा त्याला विचारते की, ‘आईच्या पोटात काय आहे ते तू सर्वांना सांगू शकतो का?’ त्यावर जॅक आनंदाने जोरात ओरडत सांगतो की, ‘माझी बहीण.’ लिसच्या या व्हिडिओला तिच्या फॅन्ससोबतच, कलाकारांकडूनही भरपूर शुभेच्छा आणि लाइक्स येत आहेत.

लिसा आणि डिनो ललवाणी यांनी २०१६ साली फुकेटमध्ये लग्न केले होते. त्यानंतर त्यांना दोन मुलं झाली असून आता लिसा तिसऱ्यांदा आई होणार आहे. डिनो हा एक उद्योगपती आहे. त्याचे वडील पाकिस्तानी मूळचे ब्रिटिश उद्योगपती आहे. सध्या लिसा आणि डिनो हॉंगकॉंगमध्ये राहतात.

लिसाने तिच्या करियरची सुरुवात वयाच्या १७ व्या वर्षांपासून मॉडलिंगने केली होती. लिसा अतिशय प्रसिद्ध अशा किंगफिशर कॅलेंडरवर देखील झळकली आहे. सोबतच ती फेमिना, वर्व, एफएचएम, हार्पर आदी अनेक मोठ्या मासिकांच्या पहिल्या पानावरसुद्धा दिसली आहे. लिसाने मॉडेलिंगसोबत काही हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहेत.

मनोरंजन क्षेत्रातील मनोरंजक बातम्यांसाठी आमचं टेलिग्राम चॅनेल जॉइन करा येथे क्लिक करा…

तिने सोनम कपूरच्या ‘आयेशा’ सिनेमातून पदार्पण केले होते. त्यानंतर ती ‘हाउसफुल 3’, ‘द शौकीन्स’, ‘क्वीन’, ‘ऐ दिल है मुश्किल’ अशा की चित्रपटांमध्ये सुद्धा दिसली ती एक उत्कृष्ट भरतनाट्यम डान्सर देखील आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, तिला योगा करायला खूप आवडते. जर ती या क्षेत्रात अली नसती तर तिला योगा टीचर होण्याची खूप इच्छा होती. ती प्रचंड फिटनेस प्रेमी आहे. दोन डिलिव्हरीनंतर देखील लिसा एकदम फिट आहे. लिसाला धावणे हा व्यायाम प्रकार खूप आवडतो. यात ती उसैन बोल्टला तिचा आदर्श मानते.

हेही वाचा
– गोड बातमी!  वाहिनीसाहेब झाल्या आईसाहेब, अभिनेत्री धनश्री काडगावकरला पुत्ररत्न प्राप्ती
ही गोड चिमुकली आहे मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्री; ओळखा पाहू बरं
अशाप्रकारे मुग्धा गोडसेला मिळाला जीवनसाथी, वयाने १४ वर्षांनी मोठा असूनही या  कारणामुळे नाते आहे भक्कम


Leave A Reply

Your email address will not be published.