अशाप्रकारे मुग्धा गोडसेला मिळाला जीवनसाथी, वयाने १४ वर्षांनी मोठा असूनही ‘या’ कारणामुळे नाते आहे भक्कम

बॉलिवूड अभिनेत्री मुग्धा गोडसे हिने तिचा बॉयफ्रेंड राहुल देव यांच्या सोबत असलेल्या नात्याचा खुलासा


बॉलिवूड अभिनेत्री मुग्धा गोडसे हिने तिचा बॉयफ्रेंड राहुल देव यांच्या सोबत असलेल्या नात्याबद्दल बोलताना त्यांची पहिली भेट कुठे आणि कशी झाली याबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. राहुल देव यांनी त्याची बालपणीची मैत्रीण रीना हीचा सोबत लग्न केलं होत. त्या दोघांना एक मुलगा देखील आहे. पण कॅन्सरमुळे 2009 मध्ये रीनाचा मृत्यू झाला. त्यानंतर मुग्धा आणि राहूल हे दोघे खूप दिवसांपासून रिलेशनमध्ये आहेत आणि या दोघांचं रिलेशन खूप जास्त चर्चेत येण्याच कारण म्हणजे या दोघांच्या वयात असणार अंतर. या दोघांच्या वयामध्ये जवळपास 14 वर्षांचं अंतर आहे .

जरी अभिनेते व अभिनेत्रींसाठी त्यांचं वय महत्वाचं नसल तरी तिने खुल्या मनाने त्यांच्या रिलेशन आणि त्यांच्या वयातील अंतराची कबुली दिली आहे. मुग्धाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असे सांगितले आहे की, ‘जेव्हा तुम्ही प्रेमात पडता तेव्हा तुम्ही फक्त प्रेमच करता. त्यात वयाला काहीच महत्व नसतं. जरी राहुल माझ्यापेक्षा 14 वर्षांनी मोठा असला तरी आमच्या नात्याला वय या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही. आमच्या नात्यात वय ही फक्त एक संख्या आहे.”

तसेच तिने त्यांच्या झालेल्या पहिल्या भेटीबद्दल देखील सांगितले. राहुल आणि मुग्धा यांची पहिली भेट 2013 ला एका कॉमन फ्रेंडच्या लग्नात झाली होती. तिथे त्यांची ओळख झाली आणि नंतर चांगले मित्र देखील झाले. त्यानंतर काही दिवसांनी ते एकमेकांत गुंतल्याचे लक्षात आल्यानंतर 2015 साली ते रिलेशनमध्ये आले.

ती म्हणते की, “माझ्या मते ,प्रेम म्हणजे कोणती शॉपिंग नाही की तुम्ही बाजारात जाऊन म्हणाल की मला लाल रंगाची बॅग पाहिजे आहे. प्रेम हे नकळत होत आणि जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात पडता तेव्हा तुमच्यासाठी बाकीच्या कोणत्याच गोष्टी महत्वाच्या नसतात. मग वय, रंग, उंची यांना काहीच अर्थ उरत नाही.”

पुण्यात जन्म झालेल्या मुग्धाने २००८ साली आलेल्या मधुर भांडारकरच्या फॅशन सिनेमातून बॉलीवूड पदार्पण केले होते. ३४ वर्षीय मुग्धाने आतापर्यंतने जवळपास १८ सिनेमात काम केले असून त्यातील काही प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. छोट्या पडद्यावर काही रियॅलिटी शोजमध्ये ती जज, काहींमध्ये पाहुणी म्हणून दिसली तर दोन शोजमध्ये ती प्रत्यक्ष सहभागी झाली.


Leave A Reply

Your email address will not be published.