Wednesday, August 6, 2025
Home हॉलीवूड ‘साेपे नव्हते लिसा यांचे आयुष्य’, शाेकात बुडालेल्या सेलिब्रिटींनी गायिकेला वाहिली श्रद्धांजली

‘साेपे नव्हते लिसा यांचे आयुष्य’, शाेकात बुडालेल्या सेलिब्रिटींनी गायिकेला वाहिली श्रद्धांजली

प्रसिद्ध अमेरिकन गायिका आणि गीतकार लिसा मेरी प्रेस्ली यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. वयाच्या 54व्या वर्षी गायिकेने अखेरचा श्वास घेतला. लिसा मेरी प्रेस्ली दिवंगत अमेरिकन अभिनेता एल्विस प्रेस्ली यांची लेक होती. त्यासाेबतच त्या दिवंगत पॉप गायक व डान्सर मायकल जॅक्सन यांची पूर्व पत्नी होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीत शाेककळा पसरली आहे. काही सेलिब्रिटी त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांची आठवण काढत आहेत, तर काही त्याच्या आयुष्यातील अडचणींचे वर्णन करत आहेत.

गायिका लिसा मेरी प्रेस्ली (lisa marie presley) यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांनवर दु:खाचा डाेंगर काेसळला आहे. “माझी सुंदर लेक लिसा मेरी आम्हाला सोडून गेली आहे, ही बातमी मी जड अंतःकरणाने तुम्हा सर्वांना सांगत आहे. ती मला माहीत असलेली सर्वात स्ट्राॅंग आणि प्रेमळ स्त्री होती. आम्ही या दुःखद परिस्थितीत आमची प्रायव्हसी जपण्याची विनंती करतो,” असं गायिकेची आई प्रिसिला प्रेस्ली यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

अभिनेत्री लेह रेमिनीने तिच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, “लिसाचे आयुष्य सोपे नव्हते. आता तिला तिचा मुलगा आणि वडिलांसोबत दफन केले जाईल.” तर गीतकार लिंडा थॉम्पसनने लिहिले, “ही बातमी ऐकून माझे हृदय तुटले.”

फॅशन डिझायनर डोनाटेला व्हर्सासने तिच्या इन्स्टा अकाउंटवर लिहिले आहे की, “आम्ही एकत्र घालवलेले क्षण मी कधीही विसरणार नाही.”, तर अभिनेता ऑक्टाव्हिया स्पेन्सरने ट्विटरवर लिहिले की, “आम्ही लिसा मेरी प्रेस्ली यांना गमावून एक महान कलाकार गमावला, याचे मला खूप दुःख होत आहे. देव तिच्या प्रियजनांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो.” अशाप्रकारे कलाकार त्यांच्या निधनावर दुख:द पाेस्ट शेअर करत त्यांना श्रध्दांजली वाहत आहे.

गायिका लिसा प्रेस्ली यांनी पॉप गायक व डान्सर दिवंगत मायकल जॅक्सन यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, दोन वर्षातच त्या दाेघांचा घटस्फोट झाला. (lisa marie presley death hollywood stars give tribute to singer)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध हॉलिवूड गायिका लिसा प्रेस्ली यांचे वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी निधन
कपड्यांमुळे झाला मलायका आणि अरबाज खान यांचा घटस्फोट? खुद्द अरबाजने सांगितले खरे कारण

हे देखील वाचा