दुसऱ्या भाषेतील रिमेक असणाऱ्या ‘या’ मराठी मालिका लुटतायत मैफील, यादीत गृहिणींच्या आवडत्या मालिकांचा समावेश

0
142
Marathi-Serials
Photo Courtesy : ScreenGrab/Hotstar

सिनेमाचा रिमेक होणं ही गोष्ट आता जवळपास कॉमनच झालीय, पण हीच क्रेझ आता दैनंदिन मालिकांमध्येही पाहायला मिळू लागलीय. इतर भाषेतील मालिकांचा मराठीत रिमेक बनवला गेलाय. या लेखात आपण अशाच काही मराठी मालिकांबद्दल जाणून घेणार आहोत.

स्वाभिमान शोध अस्तित्वाचा
स्टार प्रवाह या चॅनेलवर ‘स्वाभिमान शोध अस्तित्वाचा’ ही मालिका अलीकडच्या काळात खूपच गाजत आहे. यामध्ये आजकालच्या मुलींना आपल्या पायावर कशाप्रकारे उभा राहता येईल हे दाखवण्यात आलंय. यातील पल्लवी म्हणजेच अभिनेत्री पूजा बिरारी ही शिक्षणासाठी तिचं घर सोडून येते. पूजाला तिच्या आयुष्यात खूप मोठं होऊन तिच्या पायावर उभं राहायचं असतं, पण तिच्या वडिलांना तिने शिक्षण घेऊ नये असं वाटत असतं. तिचे वडील तिचं जबरदस्तीने एका मुलासोबत लग्न लावून देतात, जे पूजाला मान्य नसतं. त्यामुळे पल्लवी घरातून पळून तिच्या पुढील शिक्षणासाठी जाते आणि अभ्यासात सुद्धा हुशार असणारी पल्लवी तिच्या कॉलेजमध्ये नेहमीच उपक्रमांमध्ये पुढाकार घेते. ही मालिका बंगाली भाषेतील ‘मोहोर’ या मालिकेचा रिमेक आहे.

सहकुटुंब सहपरिवार
पुढील मालिका म्हणजे ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका एका कुटुंबावर आधारित आहे, जी प्रत्येकांच्या सुख-दुःखात एकमेकांसोबत असतात. या मालिकेत मराठी इंडस्ट्रीमधील कलाकार हे मुख्य भूमिकेत दाखवण्यात आलेत. सुनील बर्वे आणि नंदिता पाटकर हे या मालिकेत घरातील कुटुंब प्रमुखांच्या भूमिका साकारतायत. आजकाल आपण कुटुंब तुटत असताना पाहत असतो, पण या मालिकेत हे कुटुंब नेहमी एकसोबत असताना दाखवलंय. ही मालिका तमिळ भाषेतील ‘पांडियन स्टोर्स’ चा मालिकेचा रिमेक आहे.

आई कुठे काय करते
यानंतर सध्या प्रेक्षकांच्या हृदयात घर करून राहिलेली सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे, ‘आई कुठे काय करते’. वयात आलेल्या मुलीचं लग्न झाल्यानंतर ती जेव्हा सासरी जाते, तेव्हापासूनच तिच्यावर गृहिणीचा शिक्का पडतो. असंच काहीसं या मालिकेत दाखवलं जातंय. अरुंधती या मध्यमवर्गीय गृहिणीनं आपलं जीवन पती आणि मुलांसाठी समर्पित केलंय. तिचे प्रयत्न व्यर्थ आहेत हे समजून, तसेच गृहिणी म्हणून तिचं काम आणि त्यागाचं कोणीही कौतुक करत नाही, म्हणून ती स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी बाहेर पडते. ही मालिका बंगाली भाषेतील ‘श्रीमोयी’ या मालिकेचा रिमेक आहे.

फुलाला सुगंध मातीचा
इतर भाषेतील मालिकांचा रिमेक करणाऱ्या मालिकांमध्ये समावेश होतो ते, म्हणजे ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेचा. यामध्ये हर्षद आतकारी हा शुभम जामखेडकर ही भूमिका साकारताना दिसतोय, तर समृद्धी केळकर ही कीर्ती शुभम जामखेडकरच्या भूमिकेत आहे. या मालिकेत शुभमच्या आईला मुलींनी शिक्षण घेणं अजिबात मान्य नसतं. लग्न करून मुलीनं आपल्या संसारात शेवटपर्यंत रमून जावं या विचारांची ती दाखवलीय. परंतु शुभमचा कीर्तीच्या हुशारीवर विश्वास असल्यामुळे तो कीर्तीला आयपीएस होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत करताना दाखवलाय. परंतु त्याची आई कीर्तीला या ना त्या कारणाने घराबाहेर पडू देत नाही. तिला कुठे तरी अशी भीती वाटते की, तिची सून म्हणजेच कीर्ती शिकून मोठी अधिकारी झाली, तर ती शुभम अंबड असल्यामुळे त्याला सोडून जाईल. मात्र, कीर्तीचा शुभमवर विश्वास असल्यामुळे ती आयपीएस होण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. ही मालिका हिंदीतील ‘दिया और बाती हम’ या मालिकेचा रिमेक आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

चाहत्यांच्या काळजाला चटका लावून कलाकारांनी घेतली एक्झिट! ‘या’ दिग्गजांच्या निधनाने हादरली सिनेसृष्टी

साताजन्माच्या गाठी! तिकडं काहीही होऊद्या, पण २०२१मध्ये लग्न थाटून मजेत आहेत ‘हे’ कलाकार

हिंदी सिनेमे, नको रे बाबा! एक- दोन नाही, तर तब्बल १० चित्रपटांनी केला प्रेक्षकांचा मूड ऑफ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here