Wednesday, July 3, 2024

ओळखलंत का! ‘गाणकोकिळा’ लता मंगेशकर यांच्या मांडीवर बसलेला ‘हा’ चिमुकला आहे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक

बॉलिवूड कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील रंजक किस्से ऐकायला आणि वाचायला सगळ्यांना खूप आवडतात. कलाकारांचे वेगवेगळे फोटो पाहायला देखील सगळ्यांना खूप आवडतात. त्यात जर कलाकारांचे बालपणीचे फोटो समोर आले, तर त्यांच्या चाहत्यांना खूपच आनंद होतो. त्या फोटोवर कमेंट करून ते त्यांचे प्रेम देखील व्यक्त करत असतात. अशातच असाच एक फोटो समोर आला आहे.

या फोटोमध्ये एक लहान मुलगा लता मंगेशकर (lata mangeshkar) यांच्या मांडीवर बसलेला दिसत आहे. या फोटोत दिसणारा हा लहान मुलगा दुसरा कुणी नसून ‘बप्पी लहरी’ हे आहेत.(Little kid in lata mangeshkar lab become famous music director, photo viral on social)

बप्पी लहरी हे बॉलिवूडमधील एक लोकप्रिय संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी ‘आय एम डिस्को डान्सर ‘ हे सुपरहिट गाणे बॉलिवूडला दिले आहेत. यासोबत ‘मुंबई से आया मेरा दोस्त’, ‘तम्मा तम्मा लोगे’ तसेच ‘आज रपट जाए’ यांसारखी अनेक गाणी बॉलिवूडला दिली आहे. त्यामुळे ते सर्वत्र प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गाण्यांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे.

लता मंगेशकर या बॉलिवूडला मिळालेली एक देणगी आहे. त्यांच्या सुमधुर आवाजाने त्यांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केले आहे. अनेक मराठी आणि हिंदी गाण्यांना त्यांनी त्यांचा आवाज दिला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकमेकांना भाऊ- बहीण मानणाऱ्या लता मंगेशकर आणि दिलीप कुमारांमध्ये ‘या’ कारणाने आला होता दुरावा, 13 वर्षे…

जेव्हा राज कपूर यांनी लता मंगेशकरांना म्हटलं होतं, ‘कुरूप’ मुलगी; मग ‘गानकोकिळे’नंही घेतला होता मोठा निर्णय

हे देखील वाचा