Saturday, June 29, 2024

अल्लू अन् पूजाचा ‘हा’ सुपरहिट सिनेमा गाजवणार छोटा पडदा; लवकरच होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा‘ चित्रपटाची जोरदार चर्चा अजूनही सर्वत्र पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने कमाईचे नवनवे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. या चित्रपटाच्या यशाने अल्लू अर्जुनचा भावही चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. आता अल्लू अर्जुनच्या आणखी एका चित्रपटाचा टीव्हीवर प्रीमियर होणार आहे. त्यामुळे अल्लूचे चाहते मात्र खुश आहेत. नक्की कोणता आहे तो चित्रपट चला जाणून घेऊ…

सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा (Pushpa) चित्रपटाचा फिव्हर चाहत्यांच्या डोक्यातून अजून उतरलाही नसेल तोपर्यंत त्याच्या आणखी एका चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेगडेने काम केले असून ‘अला वैकुंठपुरमलू’ अस या चित्रपटाचे नाव आहे. ६ फेब्रुवारीला हा चित्रपट ढिंच्याक चॅनेलवर पहिल्यांदाच प्रदर्शित केला जाणार आहे. या बातमीने अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) खूपच उत्साही असल्याचे दिसत आहे. पूजा सध्या ‘राधे श्याम’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त असून याआधी तिच्या ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ या चित्रपटानेही जोरदार कमाई केली होती. आता ढिंच्याक चॅनेलवर प्रदर्शित होणारा ‘अला वैकुंठपुरमलू’ चित्रपटही त्यावर्षी प्रदर्शित झालेला सर्वात यशस्वी चित्रपट ठरला होता. यामध्ये पूजाने एका ट्रॅव्हलएजन्सी चालवणाऱ्या महिलेची भूमिका साकारली आहे. चित्रपटात तिची आणि अल्लू अर्जुनची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. या चित्रपटातील अल्लू आणि पूजाच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. आता हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित होणार असल्याने चाहते आनंदी आहेत.

या चित्रपटाबद्दल बोलताना पूजा म्हणते की, “अला वैकुंठपुरमलू २०२० मध्ये प्रदर्शित झालेला सर्वात यशस्वी चित्रपट होता. या चित्रपटाने कोरोनाकाळात प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केले.” आता हा चित्रपट पहिल्यांदाच टिव्हीवर प्रदर्शित होत असल्याने जोरदार यशस्वी ठरणार असल्याचा विश्वासही तिने यावेळी व्यक्त केला. याबद्दल पुढे बोलताना पूजाने “या चित्रपटातील माझ्या भूमिकेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानते,” असे म्हणत या चित्रपटाचा टीव्हीवरील भव्य प्रीमिअरही पाहण्याचे आवाहन तिने चाहत्यांना केले आहे.

हेही पाहा- ‘बाई वाड्यावर या’ बोलणाऱ्या निळू भाऊंनी लहान असताना स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता | Nilu Fule

दरम्यान अभिनेत्री पूजा तिच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असून ‘राधेश्याम’, ‘बीस्ट’, ‘हाऊसफुल ५’, ‘सर्कस’, आणि ‘आचार्य’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा