सध्या चित्रपटक्षेत्रात सर्वत्र अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पाचीच चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने कमाइचे नवनवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. सध्या चित्रपटाने ३५० कोटीचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाची लोकप्रियता इतकी आहे की, डेव्हिड वॉर्नरपासून अनेक क्षेत्रातील लोकांनी या चित्रपटाच्या गाण्यांवर रिल्स बनवायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाने सर्व चित्रपटांच्या कमाइचे रेकॉर्ड तर मोडलेच, सोबतच यामधील कलाकारांची लोकप्रियताही वाढली आहे.
चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मात्र या चित्रपटातील भूमिकांसाठी इतर काही कलाकारांना विचारण्यात आले होते, मात्र त्यांनी नकार दिला. आता या चित्रपटाची कमाइ पाहून त्यांना पश्चाताप होत असेल, हे नक्कीच! तर कोण आहेत हे कलाकार चला जाणून घेऊ…
महेश बाबू (Mahesh Babu)
‘पुष्पा द राइज’ चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी अभिनेता महेश बाबूला निर्मात्यांनी पहिली पसंती दाखवली होती. त्याच्याकडे याबाबत विचारणाही करण्यात आली होती. मात्र महेश बाबूला या चित्रपटाची कथा आवडली नसल्याने आणि प्रतिमा बिघडण्याची भीती सांगत महेश बाबूने या चित्रपटाला नकार दिला. त्यानंतर ही भूमिका अल्लू अर्जुनला देण्यात आली.
पूजा हेगडे (Pooja Hegde)
या चित्रपटात प्रमुख नायिका म्हणून पूजा हेगडेला घेण्यात येणार होते. मात्र ती प्रभाससोबत ‘राधेश्याम’ चित्रपटात व्यस्त असल्याने तिला या चित्रपटासाठी नकार द्यावा लागला.
दिशा पटानी (Disha Patani)
या चित्रपटातील आयटम सॉंग सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला आहे. या गाण्यासाठी समंथाच्या आधी दिशा पटानीला विचारण्यात आले होते. मात्र तिने जास्त मानधन मागितल्याने निर्मात्यांनी आपला निर्णय बदलला.
नोरा फतेही (Nora Fatehi)
चित्रपटातील गाण्यासाठी बॉलिवूडची प्रसिद्ध डान्सर नोरा फतेहीला विचारण्यात आले होते, मात्र तिनेही मोठी रक्कम मागितल्याची माहिती समोर आली आहे.
विजय सेतुपती (Vijay Sethupathy)
या चित्रपटात विजय सेतुपतीला मुख्य भूमिकेसाठी पसंती दर्शवली होती. मात्र विजय इतर चित्रपटात व्यस्त असल्याने त्याला नकार द्यावा लागला.
नारा रोहित (Nara Rohit)
या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेसाठी दाक्षिणात्य सुपरस्टार नारा रोहितला विचारण्यात आले होते मात्र त्याने ही ऑफर धुडकावून लावली.
दरम्यान या दिग्गजांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहून आता मात्र त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा :