कंगना रणौतचा शो लॉकअप चांगलाच गाजत आहे. शोमध्ये स्पर्धकांकडून केले जाणारे विविध खुलासे नेहमीच शोला चर्चेत आणताना दिसतात. अशातच या शोमध्ये सहभागी स्पर्धकांमध्ये मोठया प्रमाणावर भांडणं आणि वाद देखील होताना पाहायला मिळत आहे. शोमध्ये जीशान आणि आजमा यांच्यात गोष्टी काही खास नाही. दोघं नेहमीच भांडताना दिसतात. नुकतेच या दोघांना पुन्हा भांडताना पाहिले गेले. यावेळी तर जीशान आणि आजमा यांच्यामध्ये झालेला वाद इतका विकोपाला गेला की, जीशानने आजमावर हात पण उचलला.
झाले असे की, “आजमा फल्लाहने जीशानची गर्लफ्रेंड असलेल्या रिहाना पंडितबद्दल अनेक अपशब्द बोलल्यामुळे त्यांच्यातला वाद वाढला. या गोष्टीमुळे जीशान भावुक देखील झाला. मात्र तरीही आजमा तिचे बोलणे थांबवत नाही आणि हे ऐकून जीशानचा रागाचा पारा वाढतो आणि तो रंगाच्या भरात तिला मारण्याचा प्रयत्न करतो. पण तेव्हाच घरातील इतर सदस्य त्याला थांबवतात. आजमाचे बोलणे चालूच असल्याने तो रंगात तिची बॅग घराच्या यार्ड भागात फेकून देतो. आजमाचे बोलणे ऐकून जीशान तिच्या सामानाची तोडफोड करतो. तिच्या मेकअपचा सामान खराब करत तिचे औषधं देखील बाहेर फेकून देतो.
जीशान खानला आजमाला धमकी देताना म्हणतो, “तिला सांगा शांत राहायला सांगा नाहीतर मी तिचे तोंड पकडून जबड्यातून बाहेर काढत त्याचे तुकडे करेल. जीशान आजमाच्या चेहऱ्यावर झाडू देखील मारतो. हे पाहून इतर स्पर्धक देखील त्याच्यावर भडकतात आणि त्याला शांत करू लागतात.
जीशानचे हे वागणे पाहून करण कुंद्रा आणि कंगना रणौत दोघेही खूपच चिडले आहेत. करणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, “तो जीशानचा फैसला करण्यासाठी सेटवर जात आहे.”
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा