Thursday, July 18, 2024

कंगनाच्या शोमध्ये मंदना करिमीने उघड केले पहिल्या पतीचे घाणेरडे गुपित, म्हणाली ‘सर्वांसोबत त्याचे…’

कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या ‘लॉकअप’ शोमुळे कमालीची चर्चेत आली आहे. जेव्हापासून हा शो सुरु झाला तेव्हापासून कंगना आणि हा शो सतत लाईमलाइटमध्ये आहे. शोमध्ये सभागी झालेले स्पर्धक नेहमीच विविध खुलासे करून लक्ष वेधून घेत आहेत. हटके संकल्पनेवर आधारीत असलेला हा एकता कपूरचा शो प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करताना दिसून येत आहे. शोमध्ये नुकतीच वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री घेतलेल्या मंदना करीमीने (Mandana Karimi) शोमध्ये तिच्या वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्यातील अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने तिच्या पहिल्या नवऱ्याबद्दल आणि उद्योजक असणाऱ्या गौरव गुप्ताबद्दल अनेक मोठे खुलासे केले.

अजमा फल्लाहसोबत चर्चा करताना मंदना करिमीने सांगितले की, ती ज्याला कोणाला ओळखत होती त्या सर्वांसोबत गौरव गुप्ताचे संबंध होते. यावेळी मंदना म्हणाली, “जेव्हा मी २७ वर्षाची होती तेव्हा माझे लग्न झाले. आम्ही एकमेकांना अडीच वर्ष डेट केले आणि त्यानंतर साखरपुडा केला. पुढे आम्ही सात महिने एकत्र राहिलो आणि नंतर लग्न केले. लग्नाच्या काही काळानंतर आम्ही वेगळे झालो. आमचा घटस्फोट तर आता झाला २०२१ मध्ये मात्र आम्ही खूप आधीच वेगळे झालो. या चार वर्षांमध्ये त्याने प्रत्येक स्त्रीसोबत संबंध ठेवले, जिला मी ओळखत होती.” हे ऐकून अजमाला धक्का बसतो आणि ती विचारते, “मित्रांसोबत पण का?” यावर मंदना म्हणते “माझ्याकडे कोणीच मित्र नाही.”

अजमा मंदनाला विचारते की, “तू पहिल्या पतीपासून घटस्फोट का नाही घेतला?” यावर मंदना म्हणते, “हे माझ्या गुप्त गोष्टीचा एक भाग होते. कारण कोणालाच आतापर्यंत याबाबत माहित नव्हते. मंदनाने हे देखील सांगितले की, लग्नाच्या आधी तिचे तिच्या एक्स पतीसोबत आणि तिच्या परिवारासोबत संबंध कसे होते. ती सांगते की, “लग्नाच्या आधी माझ्या नवऱ्याची आई मला फुल आणि डोनट्स पाठवायची. आम्ही सोबत कॉफी प्यायला, शॉपिंगला, पार्टीला आणि स्पासाठी जायचो. ती नेहमी काळजी घ्यायची की मी कधीही कुठेही एकटी नको जायला. जर मी एकटी कुठे गेली तर ती मला फोन करून विचरीची की माझ्यासोबत दुसरे कोणी नाही ना?” मंदनाला घरातून बाहेर पडायची परवानगी नव्हती, याशिवाय तिला घरत सलवार सूट घालावा लागायचे असे देखील तिने सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा