Friday, July 5, 2024

दुख:द! प्रसिद्ध गीतकार बिचू थिरुमला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, एआर रहमानसाठीही लिहिलीय गाणी

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार बिचू थिरुमला यांचे शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते आरोग्याच्या विविध समस्यांनी ग्रस्त होते आणि ते व्हेंटिलेटरवर होते. काव्यात्मक गुणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या लोकप्रिय गीतकाराने वयाच्या ८० व्या वर्षी एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. थिरुमला १९७० ते १९९० च्या दशकापर्यंत मल्याळम सिनेमातील गीतकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी सुमारे ३००० चित्रपट गीते तसेच अनेक भक्तिगीते लिहिली. त्यांनी एमएस बाबुराज ते एआर रहमानपर्यंत अनेक संगीतकारांसोबत काम केले आहे.

आपल्या लेखनातून सर्व प्रकारच्या परिस्थितीला साजेसे शब्द जुळवून घेण्यात ते पटाईत होते. ‘थेनम वयंबम’मधील ‘ओट्टटक्कंबी नादम’, ‘पदकली’ या गाण्यांच्या बोलातून त्यांचे खूप कौतुक झाले. थिरुमला यांना १९८१ मध्ये ‘थेनम वयंबम’ आणि ‘तृष्णा’ आणि पुन्हा १९९१ मध्ये ‘कदिनजूल कल्याणम’साठी सर्वोत्कृष्ट गीतकाराचा राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, “बिचू थिरुमला यांनी त्यांच्या गाण्यांद्वारे चित्रपट संगीत लोकांच्या जवळ आणले.”

त्यांच्याशिवाय केरळच्या राज्यपालांनीही तिरुमला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिले की, “श्री बिचू थिरुमला, प्रख्यात गीतकार आणि कवी यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. ज्यांच्या सुरांनी तीन दशकांहून अधिक काळ लोकांच्या सर्व वर्गांना मंत्रमुग्ध केले.. माझे मनःपूर्वक शोक.”

बऱ्याच लोकांना माहिती नाही की, बिचू थिरुमला यांनी ए.आर. रहमानसाठी देखील ओळी लिहिल्या आहेत. जे जगभरात त्यांच्या जादुई संगीत आणि आवाजासाठी प्रसिद्ध आहेत. एआर रहमानने आवाज दिलेल्या ‘योधा’ चित्रपटातील मल्याळम संगीतासाठी त्यांनी ओळी लिहिल्या. त्यांचे पहिले गाणे ‘ब्रह्म मुहूर्तथिल’ खूप गाजले. १९७० च्या दशकात त्यांची भेट संगीत दिग्दर्शक ए. टी. उमर यांच्यासोबत त्यांनी अनेक मधुर सुरांची रचना केली.

गाण्याचे बोल लिहिण्याबरोबरच थिरुमला यांनी अभिनयातही हात आजमावला होता. त्यांनी १९७२ मध्ये सीआरके नायर दिग्दर्शित आणि संगीतकार म्हणून जया विजया अभिनीत ‘भज गोविंदम’ या मल्याळम चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यानंतर तिरुमाला सर्वात यशस्वी मल्याळम गीतकार बनले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा

-अश्लील चित्रपट प्रकरणात पुन्हा वाढल्या राज कुंद्राच्या अडचणी, न्यायालयाकडून फेटाळण्यात आला अटकपूर्व जामीन

-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

हे देखील वाचा