Monday, June 17, 2024

Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर

लोकप्रिय शो ‘बिग बॉस १५’ मध्ये सध्या बराच ड्रामा सुरू आहे. या आठवड्यात अनेक स्पर्धक घरातून बेघर होणार आहेत, तर काही वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्रीही होणार आहे. बुधवारी (२४ नोव्हेंबर) सिंबा नागपाल शोमधून बाहेर पडल्यानंतर, आज (२६ नोव्हेंबर) टॉप ५ स्पर्धकांपैकी ३ जण घरातून बेघर झाले आहेत.

‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने सांगितले होते की, फक्त टॉप ५ स्पर्धक घरात राहणार आहेत. त्यानंतर भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया बिग बॉस बनले. कुटुंबातील सदस्यांना त्यांनी एक टास्क दिला आणि त्यानंतर कोणते तीन स्पर्धक घराबाहेर पडणार हे सांगितले. (bigg boss 15 jay bhanushali vishal kotian neha bhasin are evicted from the show)

जय, नेहा आणि विशाल झाला बेघर
भारती आणि हर्षने घरात प्रवेश करताच घरातील ५ स्पर्धकांना एक टास्क दिला. ज्यामध्ये त्याला विचित्र गोष्टी करून, टॉप ५ लोकांच्या प्रतिक्रिया घ्याव्या लागल्या. हे कार्य करण्यासाठी सर्व स्पर्धकांकडून वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करण्यात आला. विशालने दाढी केली, तर उमर आणि राजीव यांनीही बरीच मेहनत घेतली.

भारती आणि हर्ष यांनी हे कार्य संपवत, सर्व स्पर्धकांना लाईव्ह वोटिंगचा निकाल सांगितला. जय भानुशाली, विशाल कोटियन आणि नेहा भसीन कमी मतांमुळे शोमधून बाहेर पडले. दुसरीकडे, उमर रियाझ आणि राजीव अडातिया या आठवड्यात इव्हिक्शनमधून वाचलेले पाहायला मिळाले.

होणार आहे वाईल्ड कार्ड एन्ट्री
बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. शोचा घसरलेला टीआरपी पाहता, वाईल्ड कार्ड स्पर्धकांना एन्ट्री देण्यात येणार आहे. राखी सावंत, रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्जी या शोमध्ये प्रवेश करणार आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, राखीसोबत तिचा पती रितेश देखील यावर्षी बिग बॉसच्या घरात येणार आहे. याचा प्रोमो देखील आला आहे, ज्यामध्ये राखी म्हणते की, ती तिच्या पतीसोबत घरात प्रवेश करणार आहे. सध्या तिन्ही वाइल्ड कार्ड एन्ट्री क्वारंटाईनमध्ये आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-असे काय झाले की, तुटले शाहरुख खानच्या मुलीचे हृदय? सुहानाने शेअर केलेला फोटो चर्चेत

-ऐकावे ते नवलंच! ब्रेकअपचे दुःख विसरण्यासाठी ‘या’ हॉलिवूड अभिनेत्याने केला प्रमाणापेक्षा अधिक सेक्स

-लंडनमध्ये भर रस्त्यात टायगर श्रॉफ दिसला ‘या’ व्यक्तीबरोबर फ्लर्ट करताना, व्हिडिओ झालाय व्हायरल

हे देखील वाचा