Wednesday, April 30, 2025
Home अन्य ‘मृत्यू आणि देवाला एकत्रच पाहिले’, अपघातानंतर सुपरहिट ‘बारिश की जाये’ फेम गीतकाराची पोस्ट व्हायरल

‘मृत्यू आणि देवाला एकत्रच पाहिले’, अपघातानंतर सुपरहिट ‘बारिश की जाये’ फेम गीतकाराची पोस्ट व्हायरल

संगीतविश्वातून थरकाप उडवणारी बातमी समोर येत आहे. ‘तितलियां’ आणि ‘बारिश की जाये‘ फेम पंजाबी म्युझिंक कंपोजर आणि गीतकार जानी याचा मंगळवारी (दि. १९ जुलै) सायंकाळी रस्ते अपघात झाला. माध्यमांतील वृत्तानुसार, दोन लोकांसोबत प्रवास करणाऱ्या जानीची एसयूव्ही गाडी मोहालीच्या सेक्टर ८८च्या जवळ ट्रॅफिक लाईटवर एका गाडीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, गाडी दोनदा पलटी झाली. गाडी पलटी होण्यापूर्वी दोन व्यक्ती गाडीमधून खाली पडले होते. जानी आणि त्याच्यासोबत प्रवास करत असलेल्या दोन व्यक्तींना मोहालीतील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

माध्यमांतील वृत्तांनुसार, दुसऱ्या गाडीत बसलेल्या लोकांना थोडीफार दुखापत झाली. सोहानाचे एसएचओ गुरजीत सिंग यांनी सांगितल्यानुसार, पोलीस घटनास्थळी येण्यापूर्वीच दुखापतग्रस्त झालेल्या लोकांना रुग्णालयात नेण्यात आले. माध्यमांताल वृत्तांनुसार, गाडी कोण चालवत होते, याचा तपास अद्याप सुरू आहे. तसेच, कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

पोलिसांनी सांगितले की, हा अपघात एका चौकात घडला. दोन्ही गाड्या वेगात होत्या आणि चौकातही थांबल्या नाहीत, त्यामुळे भीषण अपघात झाला. ३३ वर्षीय संगीतकाराला आणि इतर २ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, ते या रस्ते अपघाताचा तपास करत आहेत.

जानीला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
जानीने नुकतेच त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून अपघाताबद्दल सांगितले. त्याने म्हटले की, तो मृत्यूच्या तोडांतून बाहेर आला आहे आणि बरा आहे. त्याने इंस्टाग्रामवर जारी केलेल्या निवेदनात लिहिले की, “देवाच्या कृपेने गाडीमध्ये असलेले सर्व लोक ठीक आहेत. प्राधिकरण या प्रकरणाचा तपास करत आहे. तसेच, आम्ही रुग्णालयातून डिस्चार्ज झालो आहोत. देवाची कृपा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by JAANI (@jaani777)

चाहत्यांना आवाहन
हे निवेदन शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज डोळ्यांनी मृत्यू पाहिला, पण नंतर गुरुनानक यांना पाहिले. आज मृत्यू आणि देव दोघांनाही एकसोबत पाहिले. मी तर ठीक आहे मित्रांनो. फक्त छोटी दुखापत झाली आहे. प्रार्थना करत राहा.”

दिली ही हिट गाणी
जानी हे असे नाव आहे, ज्याने बॉलिवूडध्येही आपले नाव बनवले आहे. बी प्राकसोबतच्या त्याच्या जोडीने हिंदी संगीतसृष्टीतील अनेक विक्रम मोडले आहेत. त्याने ‘बारिश की जाये’, ‘फिलहाल’ यांसारखे गीत चांगलेच गाजले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘पच्चीस दिन में पैसा ट्रिपल’, अक्षयच्या सिनेमाच्या रिमेकचा बॉक्स ऑफिसवर धमाका, निर्मात्यांकडून कौतुक

फराहची थट्टा उडवणे करण जोहरला भोवले, निर्मातीने व्हिडिओ शेअर करत काढली खरडपट्टी

‘पच्चीस दिन में पैसा ट्रिपल’, अक्षयच्या सिनेमाच्या रिमेकचा बॉक्स ऑफिसवर धमाका, निर्मात्यांकडून कौतुक

हे देखील वाचा