Friday, July 5, 2024

खलनायिका साकारून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री माधवी निमकर ‘शेर शिवराज’ सिनेमात साकारणार ‘ही’ महत्वाची भूमिका

कलाकार नेहमीच त्यांच्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक भूमिकेला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र कधी कधी काही कलाकार विशिष्ट भूमिकांमध्येच चपखल बसतात किंवा प्रेक्षकांना देखील त्यांना त्याच एकाच प्रकारच्या भूमिकांमध्ये पाहायचे असते. जसे एखाद्या कलाकाराला विनोदी अभिनेता म्हणून ओळख मिळाली तर त्याने दुसरी कोणती भूमिका केली तर प्रेक्षक ती कितपत स्वीकारतील आणि त्यांना इतर भूमिकांमध्ये देखील यश मिळेल की नाही आदी अनेक प्रश्न उपस्थित होतात. मात्र तरीही काही कलाकार थोडी रिस्क घेऊन जरा वेगळ्या भूमिका करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

लवकरच छत्रपती शिवाजीच्या महारांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अध्याय असलेला अफजल खानचा वध आपल्याला चित्रपटाच्या रूपात पाहायला मिळणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शेर शिवराज’ या सिनेमात महाराजांच्या या विजयाची गाथा आपण पाहणार आहोत. येत्या २२ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होत असून, सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन चालू आहे. यासोबतच सिनेमातील विविध कलाकार आणि त्यांच्या भूमिकांवरून देखील हळूहळू पडदा उठवला जात आहे.

यातच नुकताच ‘शेर शिवराज’ या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी ‘सोयरा बाई’ यांच्या भूमिकेवरून पडदा उठवण्यात आला आहे. या सिनेमात ही महत्वाची भूमिका टेलिव्हिजनविश्वातील अतिशय क्रूर खलनायिका अशी ओळख असलेली माधवी निमकर साकारणार आहे. नुकतेच सोशल मीडियावर तिच्या भूमिकेचे की पोस्टर प्रदर्शित केले गेले असून, तिच्या भूमिकेचे नाव देखील जाहीर केले गेले आहे.

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ या सिनेमात माधवीने बाजीप्रभू देशपांडे यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. अतिशय लाघवी, समंजस, निरागस, समजुदार आशय अय भूमिकेतून माधवीने तुफान वाहवा मिळवली. प्रभावीपद्धतीने ही भूमिका साकरल्यामुळे माधवीच्या पदरी आता थेट सोयरा राणी यांची भूमिका आली आहे. शिवाजी महाराजांच्या पत्नी असलेल्या सोयरा बाई यांनी महाराज नसताना अतिशय उत्तम पद्धतीने राज्य संभाळले आणि संभाजी राजे यांना उत्तम संस्कार दिले.

माधवी निमकरची भूमिका जाहीर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “सांभाळू आम्ही आऊसाहेबांना, थोरल्या राणीसाहेबांना, बाळराजेंना आणि सगळ्यांनाच….. शब्द आहे आमचा! मातोश्री सोयराबाई राणीसरकार” या भूमिकेत माधवी अतिशय सुंदर दिसत असून, तिच्या नजरेत एक करारीपणा, राणी असल्याचे तेज झळकत आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील आठ महत्वाच्या घटनांवर दिग्पाल लांजेकर सिनेमा काढणार असून ‘शेर शिवराज’ हा याच अष्टकातील एक सिनेमा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा