Monday, June 9, 2025
Home मराठी डिपनेक लाँग गाऊनमध्ये खुलले माधवी निमकरचे सौंदर्य, नवीन फोटो आले चर्चेत

डिपनेक लाँग गाऊनमध्ये खुलले माधवी निमकरचे सौंदर्य, नवीन फोटो आले चर्चेत

आपल्या आयुष्यात फिटनेसला खूप महत्व आहे. त्यात कलाकार म्हटले तर ते २४ तास त्यांच्या फिटनेसची काळजी घेत असतात. अशीच मराठी टेलिव्हिजनवरील एक नावाजलेली खलनायिका देखील तिच्या फिटनेसची खूप चांगल्याप्रकारे काळजी घेताना दिसत असते. ती अभिनेत्री म्हणजे माधवी निमकर होय. माधवी अनेकवेळा तिचे जिम करताना आणि योगा करताना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे काही किलर फोटो समोर आले आहेत.

माधवीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने निळ्या रंगाचा डीपनेक लाँग गाऊन घातला आहे. गळ्यात तिने छोटासा डायमंड नेकलेस घातला आहे. या ड्रेससोबत तिने साईड बॅग घेतली आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. ( Madhavi nimkar share her beautiful photo on social media)

माधवीच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूपच आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या या फोटोवर एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “तुम्ही कोणताही लूक करा तुम्ही छानच दिसता.” तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

माधवीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००९ साली ‘बायकोच्या नकळतचं’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर तिने ‘असा मी तसा मी’ या चित्रपटात काम केले. तिने ‘धावाधाव’, ‘सगळं करून भागले’, ‘संघर्ष’ या चित्रपटात काम केले आहे. यानंतर तिने तिच्या अभिनयाचा मोर्चा मराठी टेलिव्हिजनकडे वळवला.

तिने ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘हम तो तेरे आशिक है’, ‘द रायरीकर केस’ या मालिकांमध्ये काम केले आहे. सध्या ती स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत नकारात्मक भूमिकेत काम करत आहे. तरी देखील मालिकेतील तिचे पात्र आणि डायलॉग तिच्या चाहत्यांना खास भुरळ घालत आहेत.

हेही वाचा :

आनंद शिंदे यांनी मीरा आणि जय यांना दिली गाण्याची ऑफर, आगामी काळात झळकणार एकत्र

‘भाऊने माझा केसाने गळा कापला असता’, म्हणत कुशल बद्रिकेने शेअर केला भाऊ कदमसोबतचा ‘तो’ किस्सा

अजय देवगणच्या लेकीचे बोल्ड फोटो होतायत इंटरनेटवर व्हायरल, तुम्ही पाहिले का? 

 

हे देखील वाचा