Monday, July 1, 2024

काय सांगता! माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या तेजाब सिनेमाचा येणार रिमेक

मधल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये रिमेक आणि सिक्वल यांचा सिझन सुरु झाला आहे. अनेक चित्रपटांचे रिमेक आणि सिक्वल येऊन गेले आहेत तर काही येणार आहेत. काही येणाऱ्या रिमेकमध्ये एक नाव म्हणजे ‘तेजाब २’. माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांचा सुपरहिट सिनेमा असलेल्या ‘तेजाब’चा लवकरच रिमेक येणार आहे. ज्या सिनेमाने माधुरीला आणि अनिल कपूरला इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळवून दिली त्या सिनेमाचा या लवकरच रिमेक येऊ घातला आहे. निर्माते मुराद खेतानी यांनी याबाबत माहिती दिली आहे. लवकरच या सिनेमाच्या प्री प्रोडक्शनचे काम चालू होणार आहे.

एका मुलाखतीदरम्यान ‘तेजाब’ चित्रपटाचे दिग्दर्शक असणाऱ्या एन चंद्रा यांच्याकडून रिमेकचे हक्क घेतलेल्या मुराद खेतानी यांनी सांगितले की, “हा एक आयकॉनिक चित्रपट आहे आणि जेव्हा पण आम्ही हा सिनेमा बनवू तेव्हा आजच्या काळानुसारच या चित्रपटाची कहाणी घेऊ.” यापेक्षा अधिक माहिती त्यांनी दिली नसली तरी तर हा रिमेक बनवण्यासाठी खूपच उत्साही आणि विश्वासू आहेत. या सिनेमात कोणते कलाकार असणार याबद्दल माहिती नसली तरी माधुरी दीक्षित यात असणार हे नक्की आहे. १९८८ साली आलेल्या या सिनेमात माधुरी दीक्षित चित्रपटाची जान होती.

तेजाब चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या एन चंद्रा यांनी एका मुलाखतीमध्ये या रिमेकवर आपत्ती घेत सांगितले होते की, “क्लासिक चित्रपटांना हात लावायला नको. याचे एक कारण देखील आहे. ते चित्रपट एका विशिष्ट काळात बनवले गेले असून त्या काळानुसार त्याची कथा लिहिण्यात आली आहे. तेजाब एक असा सिनेमा आहे ज्याचा रिमेक नाही बनू शकत. मला नाही वाटत या आयकॉनिक चित्रपटाचा रिमेक व्हावा. मी असो किंवा इतर कोणीही या सिनेमाला हात लावू नये.” १९८८ साली आलेल्या या सिनेमाने तुफान लोकप्रियता मिळवली. या सिनेमात माधुरी दीक्षित, अनुपम खेर, अनिल कपूर, चंकी पांडे आदी कलाकार मुख्य भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा