बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ म्हणून ओळखणारी माधुरी दीक्षित एक उत्कृष्ट अभिनेत्री तसेच एक उत्तम डान्सर देखील आहे. तिच्या डान्ससाठी तिला तिच्या आईकडून प्रेरणा मिळाली. माधुरीच्या आईला नृत्य आणि गाण्याची आवड होती. पण त्या कधीही ते शिकू शकल्या नाहीत, कारण त्या काळात नृत्य करणे चांगले मानले जात नव्हते. अशा परिस्थितीत माधुरीच्या आईने आपल्या मुलीला नृत्य शिकविण्याचा निर्णय घेतला. माधुरीची मोठी बहीण कथ्थक नर्तक आहे. मोठ्या बहिणीला पाहून माधुरीने वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच नृत्य करण्यास सुरुवात केली होती.
दूरदर्शनला दिलेल्या एका मुलाखतीत माधुरी म्हणाली की, “मी बिरजू महाराजांची मोठी फॅन आहे. बिरजू महाराजांनी अमेरिकेत कार्यक्रम केला, तेव्हा मी तिथे पोहोचले होते. त्यानंतर मी तिथे त्यांच्या कार्यशाळेतही सामील झाले. जेव्हा मी तिथे गेले, तेव्हा ते म्हणाले की, ‘अच्छा, तर तुला डान्स शिकायचा आहे?’ मी हो म्हणाले. त्यावेळी ते म्हणाले, ‘ठीक आहे, त्या एक- दो, तीन गाण्यात शेवटची स्टेप कशी केली ते आधी सांग, मग मी तुला कथ्थक शिकवतो.'”
माधुरीबरोबर नाचणे कोणत्याही अभिनेत्यासाठी सोपी गोष्ट नाही. म्हणूनच तिच्या सहकारी कलाकारांना तिच्यासोबत डान्स करण्यापूर्वी बराच सराव करावा लागत असे. अनिल कपूर म्हणतात की, “जेव्हा मी राम लखन मध्ये क्लायमॅक्सचे गाणे करत होतो, तेव्हा मला वाटले की हो हे खरंच कमालीचं आहे.”
‘दिल’ चित्रपटातील आमिर खान आणि माधुरीच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. चित्रपटातील ‘दम दमा दम’ या गाण्यात कठीण स्टेप्स होत्या. हे गाणे हिट झाले होते, पण सुरुवातीला आमिरला ते करण्याची इच्छा नव्हती. याचे मुख्य कारण होते माधुरी दीक्षित. नंतर आमिरने मुलाखतीत सांगितले की, “मला वाटले की हे गाणे मी नको करायला कारण माधुरी खूप चांगली डान्सर आहे. आता मी असे गाणे का करावे ज्यामध्ये लोकांना दिसेल की माधुरी माझ्यापेक्षा चांगली नाचत आहे. म्हणून मी या गाण्याला नकार दिला होता. चित्रपटाचे दिग्दर्शक इंद्रकुमारने जेव्हा माझी समजुत काढली, तेव्हा मी ते मान्य केले होते.”
‘एक दो तीन’ गाण्याने माधुरीच्या कारकीर्दीला यशाच्या शिखरावर नेले. हे गाणे सरोज खान यांनी कोरिओग्राफ केले होते. सरोज खान यांनी माधुरीचे कौतुक करत म्हटले होते की, “जेव्हा माधुरी हे गाणे करत होती, तेव्हा ती 17 दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत सतत नाचत असे. तेही न थांबता.”
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आयुष्यात संतुलन महत्त्वाचे आहे, नाहीतर सनीसारखं चालता चालता पडाल स्विमींग पुलमध्ये