‘होली में दे दे चुम्मा’, गुंजन सिंगच्या नवीन भोजपुरी गाण्याची सोशल मीडियावर धमाल; एकाच दिवसात मिळाले लाखो व्ह्यूज

In This Season Holi 2021 New Bhojpuri Song Gunjan Singh Holi Mein De De Chumma Song Viral


दिवाळी, गणेशोत्सव, ईद असे अनेक सण भारतात साजरे केले जातात. यातीलच एक सण म्हणजे होळी. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळीच्या तयारीला आतापासूनच सुरुवात झाली आहे. होळी हा असा सण आहे, ज्यामध्ये अनेकजण पार्टी करताना दिसतात. यामध्ये पार्टीसोबतच गाणेही तितकेच महत्त्वाचे आहेत. जर धमाकेदार गाणे नसतील, तर होळीची मजाच नाहीशी होते. अशामध्ये होळीच्या आधीच भोजपूरी गाण्यांनी इंटरनेटवर आग लावली आहे. होळीवरील एका पाठोपाठ एक भोजपूरी गाणे रिलीझ होत आहेत, ज्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

भोजपूरी अभिनेता आणि गायक गुंजन सिंगचे होळी सणानिमित्त एक गाणे रिलीझ झाले आहे. या खास गाण्याचे नाव ‘होली में दे दे चुम्मा’ असे आहे. हे गाणे रिलीझ झाल्यानंतर एकाच दिवसात या गाण्याला १२ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

 

‘होली में दे दे चुम्मा’ हे गाणे गुंजन सिंग आणि अंतरा सिंग प्रियंकाने गायले आहे. या गाण्याचे बोल यादव राज यांनी लिहिले आहेत. या गाण्याचे ओरिजिनल कंपोजर हे लक्ष्मीकांत प्यारेलाल हे आहेत. या गाण्यावर गुंजन आणि प्रियंका दोघेही ठुमके लावताना दिसत आहेत.

नुकतेच सुनिल छालिया बिहारी आणि प्रियंका होळीवर एक गाणे घेऊन आले होते. या गाण्याचे नाव ‘उतार देब होली में नथुनिया’ असे आहे. आतापर्यंत या गाण्याचा केवळ ऑडिओ रिलीज झाला आहे. हे गाणे रिलीझ झाल्यानंतर यूट्यूबवरही या गाण्याची प्रशंसा केली जात आहे. अनेक प्रेक्षक म्हणत आहेत की, होळीमध्ये एन्जॉय करण्यासाठी हे गाणे उत्तम आहे.

प्रियंका भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. प्रियंकाच्या आवाजाचे लाखो चाहते आहेत. तिचे गाणे यूट्यूबवर जबरदस्त हिट होतात. प्रियंकाने आतापर्यंत अनेक गाणे गायले आहेत. ज्याप्रकारे पवन सिंग आणि खेसारी लाल यादव यांचा जबरदस्त चाहतावर्ग आहे, तसेच प्रियंकालाही चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळाले आहे.

तसं पाहिलं, तर मागील काही दिवसांपासून खेसारी, पवन सिंग आणि निरहुआ यांचेही होळीवरील अनेक गाणे रिलीझ झाले आहेत. सर्वांनी अधिकतर गाणे केवळ ऑडिओमध्ये रिलीझ केले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आय्योवं.!! चालू व्हिडिओमध्येच अभिनेत्रीने बदलले कपडे; पाहा हिना खानचा आतापर्यंतचा सर्वात ‘बोल्ड’ व्हिडिओ

-सही हैं! तब्बल एक कोटी पंच्याहत्तर लाख हिट्स मिळालेलं ‘सपना चौधरी’चं ‘रोटीयां के टोटे’ गाणं पाहिलं का?

-रिंकूने केला कुत्र्यासोबतचा एक गोंडस व्हिडीओ शेअर, चाहत्यांनी दिले भरभरून प्रेम


Leave A Reply

Your email address will not be published.