‘डान्स दीवाने’च्या सेटवर माधुरीचा ‘कजरा रे’ गाण्यावर भन्नाट डान्स, इतर जजनेही लावले ठुमके


बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी माधुरी आजही सर्वाना घायाळ करते. तिचे सौंदर्य, तिचे मनमोहक हास्य आणि दमदार नृत्याच्या जोरावर माधुरी आजही प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करते. वयाची पन्नाशी ओलांडूनही माधुरीच्या गुणांमध्ये किंचीतही फरक पडला नाहीये. या वयातही ती आजच्या पिढीच्या अभिनेत्रींना डान्स, फिटनेसच्या बाबतीत जोरदार टक्कर देते.

सध्या सोशल मीडिया माधुरीच्या रंगात रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. माधुरीचे काही डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र फक्त माधुरीची चर्चा आहे. माधुरी ‘डान्स दीवाने’ नावाचा डान्स रियॅलिटी शो मध्ये परीक्षक म्हणून काम बघते. तिच्यासोबतच तुषार कालिया आणि धर्मेश एलंडे देखील परिक्षक म्हणून कार्यक्रमात दिसतात. याच शो दरम्यान माधुरीने काही गाण्यांवर केलेल्या डान्सचे हे व्हिडिओ तुफान लोकप्रिय होत आहे.

माधुरी आकाशी रंगाच्या फ्लोरल लेहंग्यामध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. या कार्यक्रमाच्या सेटवरचे अनेक मजेशीर व्हिडिओ माधुरी अनेकदा शेअर करत असते. सध्या सोशल मीडियावर तिचा सेटवर ‘कजरा रे’, ‘प्रिटी वूमन’ अशा काही गाण्यांवरचे डान्स करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ‘डान्स दीवाने ३’ कार्यक्रमातील एका भागाचे चित्रीकरण सुरु असताना हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत स्पर्धक आणि तुषार, धर्मेश देखील नाचताना दिसत आहेत.

सध्या डान्स दिवानेचे तिसरे पर्व सुरू असून, याआधीच्या दोन्ही पर्वाचे परीक्षण माधुरीनेच केले होते. तिच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं, तर ती ‘कलंक’ आणि ‘टोटल धमाल’ या दोन चित्रपटात शेवटची दिसली होती. यातील तिचा अंदाज चाहत्यांना खूप भावला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.