बच्चे पार्टीसोबत माधुरी दीक्षितने लावले जोरदार ठुमके; डान्सने चोरली चाहत्यांची मने

आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करणारी तसेच बॉलिवूडमध्ये ‘धकधक गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित होय. ती आता खूप कमी चित्रपटात दिसते, पण या गोष्टीचा परिणाम तिच्या फॅन फॉलोविंगवर अजिबात झालेला दिसत नाही. आजही लाखो लोक तिच्या अदांवर फिदा आहेत. माधुरी दीक्षित ही ५४ वर्षांची आहे, पण तिचा डान्स आणि हावभाव बघून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. सध्या ती डान्स रियॅलिटी शो ‘डान्स दीवाने 3’ मध्ये परीक्षण करत आहे. या मंचावर ती नेहमीच अनेकांच्या फर्माइशवर डान्स करत असते. अशातच ‘डान्स दीवाने ३’च्या सेटवरून तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

माधुरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘डान्स दीवाने ३’ या शोमधील लहान स्पर्धकांसोबत डान्स करताना दिसत आहे. सगळेजण इंस्टाग्रामवरील एका ट्रेंडिंग म्युझिकवर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये माधुरीने लाल रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे. या ड्रेसवर तिने खूप सुंदर ज्वेलरी घातलेली दिसत आहे. या लूकध्येम ती खूप सुंदर दिसत आहे. याआधी देखील तिने या ड्रेसवरील फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

माधुरीने या बच्चे पार्टीसोबत शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून त्यांच्या या डान्स व्हिडिओचे कौतुक करत आहेत. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत ४१ हजारांपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ६२ हजारांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. (madhuri dixit dance with dance deewane 3 contestent, video viral on social media)

माधुरी दीक्षितने तिच्या करिअरमध्ये बॉलिवूडला एकापेक्षा एक अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिने ‘दिल’, ‘बेटा’, ‘दिल तो पागल है’, ‘हम आपके है कौन’, ‘साजन’, ‘खलनायक’, ‘देवदास’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती डान्स दीवाने या शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारत आहे. नुकतेच माधुरीने ओटीटी प्लॅनेट मराठीच्या लाँच सोहळ्याला हजेरी लावली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आये… तुझं हसणं हीच माझ्या आयुष्यातील खरी कमाई’, म्हणत सिद्धूकडून आईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा!

-सोनम कपूरच्या आयुष्यातील ‘गोड बातमी’ खरी की खोटी? अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

-खुशखबर! ‘बिग बॉस’च्या घरात ‘भाईजान’ची एन्ट्री; स्पर्धकांनी जंगल केले पार, तर उघडणार ‘बिग बॉस’चे द्वार

Latest Post