Friday, March 29, 2024

देवदासमधील चंद्रमुखी बनत माधुरीने हुनरबाजचा मंचावर पसरवला तिच्या नेत्रदीपक नृत्याचा जलवा

सध्या माधुरी दीक्षित तिच्या आगामी ‘द फेम गेम’ या सिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती टेलिव्हिजनवरील विविध शोमध्ये जाऊन या सिरीजचे प्रमोशन करताना दिसत आहे. याच प्रमोशनचा एक भाग म्हणून माधुरीने नुकतीच ‘हुनरबाज’ या शोच्या मंचावर हजेरी लावली. आपल्या सौंदर्यासाठी, हास्यासाठी आणि दमदार नृत्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या माधुरीचे संपूर्ण जगात अमाप चाहते आहेत. ती नेहमीच तिच्या अदांमधून आणि डान्समधून सर्वांना भुरळ घालत असते. ‘हुनरबाज’ शोच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर या भागाचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात माधुरी बासुरीच्या धूनवर डान्स करताना दिसत आहे.

कलर्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘हुनरबाज’ शोच्या आगामी भागाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात अनिर्बान नावाचा एक लहान मुलगा स्टेजवर अतिशय सुंदर अशी बासुरी वाजवत आहे. त्याने माधुरीच्या ‘देवदास’ सिनेमातील ‘काहे छेड़े छेड़े मोहे’ हे गाणे बासुरीच्या धूनमधून सर्वांना ऐकवले. या धूनवर माधुरी अतिशय उत्तम पद्धतीने डान्स केला. तिचा डान्स बघताना असे वाटत होते की, माधुरी देवदास सिनेमात गाण्यावरच डान्स करत आहे. या प्रोमोमध्ये तिचा दिसणारा डान्स अतिशय नजाकत आणि आकर्षक पद्धतीचा असून, तिचा डान्स पाहून परीक्षक, प्रेक्षक सर्वच स्तब्ध झालेले दिसत आहे. तिचा डान्स आणि तिचे एक्सप्रेशन बघून परिणितीने तिचा हा डान्स मोबाइलमध्ये रेकॉर्ड देखील केला.

माधुरी दीक्षित लवकरच ‘द फेम गेम’ या सिरीजच्या निमित्ताने ओटीटी प्लँटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. २५ फेब्रुवारीपासून ही सिरीज प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर बघता येणार आहे. या सिरीजच्या प्रमोशनसाठी माधुरी कपिल शर्मा शोमध्ये पोहचली होती.

माधुरीने तिच्या करिअरमध्ये एकसे बढकर एक हिट सिनेमे दिले असून, तिने लग्नानंतर अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला आणि ती अमेरिकेला सेटल झाली. पुढे तिने ‘आजा नच ले’ सिनेमातून पुनरागमन केले. पुढे ती गुलाब गॅंग, कलंक, टोटल धमाल आदी चित्रपटांमध्ये दिसली. याशिवाय तिने ‘बकेट लिस्ट’ सिनेमाच्या माध्यमातून मराठीमध्ये देखील पदार्पण केले. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये देखील माधुरी अनेक डान्स शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसते.

हेही वाचा –

बुरखा घालून चित्रपट पाहायला गेलेल्या माधुरी दीक्षितला ‘या’ कारणामुळे अर्धवट चित्रपट सोडत काढावा लागला होता पळ

हे देखील वाचा