हिंदी चित्रपट आणि मालिका क्षेत्रात यंदा अनेक अभिनेत्री प्रेग्नेंट असून लवकरच त्या गूड न्यूज देणार आहेत. यामध्ये कॉमेडियन भारती सिंगचाही समावेश आहे. भारती सिंग सध्या प्रेग्नेंट असूनही ‘हूनरबाज’ या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना दिसत आहे. तिच्या या कामाप्रती असलेल्या प्रामाणिकपणाचे अनेकांनी कौतुक केले होते. आता अभिनेत्री माधुरी दीक्षितने या कार्यक्रमात केलेल्या एका गोड कृतीचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असून सगळीकडे या व्हिडिओची चर्चा रंगली आहे.
धकधक गर्ल माधुरी दीक्षित सध्या तिच्या ‘द फेम गेम’ या वेबसिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या वेबसिरीजमधून ती पहिल्यांदाच ओटीटी फ्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे. याच सिरीजच्या प्रमोशनसाठी ती ‘द फेम गेम’चे कलाकार संजय कपूर यांच्यासोबत ‘हुनरबाज’ या कार्यक्रमात आली होती. या कार्यक्रमात परिणीती चोप्रा, मिथुन चक्रवर्ती, आणि करण जोहर हे प्रशिक्षकाची भूमिका करत आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया करत आहेत.भारती सिंग प्रेग्नेंट असुनही या कार्यक्रमात काम करत आहे. माधुरी दीक्षितने या कार्यक्रमात धमाल उडवल्याचे दिसुन आले ज्याचा प्रोमो सध्या समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये एका सादरीकरणानंतर माधुरी स्टेजवर येते आणि त्यांच्यावरून पैसे फिरवत “तुम्हाला कुणाची नजर लागू नये” असे म्हणत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी माधुरीने ते पैसे एका स्पर्धकाच्या हातात दिल्यानंतर त्याची फिरकी घेत “ते पैसे मला दे” असे भारती सिंग म्हणते. यावर माधुरी तिच्या जवळ येत तुलाही कोणाची नजर लागू नये अस म्हणत तिच्या पोटाला किस करते. माधुरीच्या या मार्मिक आणि गोड कृतीचे सगळेच कौतुक करताना दिसत आहेत. भारती सिंगचा पतीही यावर आश्चर्याने बघत असल्याचे दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान भारती सिंग आणि हर्षने गेल्या वर्षी आपल्या युट्यूब चॅनेलवरून आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती.
हेही वाचा –
नव्या सिंगने राजपाल यादवच्या तृतीयपंथी भूमिकेवर केले ‘हे’ धक्कादायक वक्तव्य
अनेक भूमिका साकारूनही सईला साकारायची आहे ‘ही’ अनोखी भूमिका, मुलाखतीत केला खुलासा