Friday, July 5, 2024

साधेपणातील सौंदर्य, चाहत्यांना भावले माधुरी दीक्षितचा सिंपल अँड सोबर लूक

बॉलिवूडमधील धकधक गर्ल अशी जिची ओळख आहे ती म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित होय. ५४ व्या वर्षी देखील तिच्या हावभावाने आणि डान्सने ती अनेक तरुणांच्या हृदयाच्या ठोका चुकवते. या वयात देखील तिचे सौंदर्य तेवढेच तेजस्वी दिसते. तिच्या डान्स आणि अभिनयाने तिने ९० च्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे आणि आजही करते. माधुरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. अशातच तिचा एक फोटो समोर आला आहे.

माधुरीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने जांभळ्या रंगाचा सुंदर असा लाँग ड्रेस घातला आहे. तिने तिचे सगळे केस मागे बांधले आहेत. तसेच कानात मोठे इअरिंग घातले आहेत. या सिंपल लूकमध्ये देखील ती खूपच सुंदर दिसत आहे. (Madhuri Dixit share her beautiful photo on social media)

हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “आत्मविश्वास हा सगळ्यात सुंदर ड्रेस आहे.” तिचा हा लूक सगळ्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोला  तिच्या चाहत्यांच्या एक लाखापेक्षाही जास्त लाइक्स आले आहेत.

माधुरी दीक्षितने तिच्या करिअरमध्ये बॉलिवूडला एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. यामध्ये ‘दिल’, ‘बेटा’, ‘दिल तो पागल है’, ‘हम आपके है कौन’, ‘साजन’, ‘खलनायक’, ‘देवदास’ यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच तिने अनेक रियालिटी शो चे परीक्षण केले आहे.

हेही वाचा :

नशेत धुंद होऊन केलेलं ट्वीट कपिल शर्माला पडलं होतं भलतंच महागात; म्हणाला, ‘मालदीवला पळून जावं लागलं…’

एक्स गर्लफ्रेंडवर नजर ठेवण्यासाठी रणबीर कपूर करतो ‘हे’ काम, ऐकून तुम्हीही व्हाल चकित

वाढलेले वजन सलमान खानसाठी बनले समस्या, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं जोरदार ट्रोल

हे देखील वाचा