एक्स गर्लफ्रेंडवर नजर ठेवण्यासाठी रणबीर कपूर करतो ‘हे’ काम, ऐकून तुम्हीही व्हाल चकित

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) एक असा अभिनेता आहे, जो ना सोशल मीडियावर असतो आणि ना त्याला लोकांना स्वतःबद्दल काही सांगणे योग्य वाटते. पण त्याच्या या वागण्यावरून असे समजू नका की, तो सोशल मीडिया वापरत नाही. तो सर्वांवर लक्ष ठेवतो, अगदी त्याच्या एक्स गर्लफ्रेंडवरही. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सोशल मीडियावर का नाही, असा प्रश्न अनेकवेळा त्याला विचारला गेला आहे. ज्याला अभिनेत्याने उत्तर दिले आहे की, “मी यापासून दूर राहतो, पण माझ्या आजूबाजूचे लोक काय करत आहेत, मला त्याची पूर्ण माहिती आहे.” रणबीर कपूरने दिलेल्या मुलाखतीदरम्यान कबूल केले की, तो सोशल मीडियावरील इतर सेलिब्रिटींवर लक्ष ठेवतो. ज्यात दीपिका पदुकोण, कॅटरिना कैफ, आलिया भट्ट यांचा समावेश आहे. (this is how ranbir kapoor keep an eye on ex girlfriends)

स्वतः केला खुलासा
एका मुलाखतीदरम्यान रणबीर कपूरला सोशल मीडियावर सक्रिय नसल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याला अभिनेत्याने उत्तर दिले की, सोशल मीडियावर चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी आहेत आणि दोन्हीचे दुष्परिणाम आहेत, त्यामुळे तो या सर्वांपासून दूर राहतो. रणबीर कपूरने असेही म्हटले होते की, “येथे चांगलेही लोक आहेत, ज्यांच्यावर मी नेहमी लक्ष ठेवतो. ज्यामध्ये कॅटरिना कैफ, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि रणवीर सिंग सारखे लोक आहेत.”

कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा सुपरहिरो चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनही दिसणार आहेत. याशिवाय रणबीरने नुकताच लव रंजनचा एक चित्रपट साईन केला आहे, ज्यामध्ये श्रद्धा कपूर देखील दिसणार आहे.

हेही वाचा :

मायरा वैकुळने ‘केळेवाली’ गाण्यावर केला असा डान्स की, सोनाली कुलकर्णीने देखील केली भन्नाट कमेंट

विवाहित असून पवन सिंग करत होता एक्स गर्लफ्रेंडसोबत रिलेशनमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त, विवादात होती गायकाची लव्हलाईफ

जेव्हा दीपिका पदुकोणला वाटायचं, ‘आयुष्य नाही महत्त्वाचं’, डिप्रेशनच्या दिवसाबाबत अभिनेत्रीने केला खुलासा

Latest Post