×

आपल्या ठुमक्यांवर नाचायला लावणारी माधुरी दीक्षित ‘या’ कलाकारांसोबत डान्स करायला घाबरायची, वाचा संपूर्ण किस्सा

धकधक गर्ल माधुरी दीक्षित आपल्या सौंदर्यासाठी आणि अभिनयासाठी तर प्रसिद्ध आहे, मात्र माधुरीच्या डान्सची अदासुद्धा काही औरच असते. माधुरीच्या ठुमक्यांनी ९० च्या दशकातील प्रत्येक अभिनेत्याला नाचायला लावले होते. मात्र माधुरी दीक्षितने मात्र तिच्या डान्सचा बाबतीत एक नवीनच खुलासा केला आहे जो ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही काय आहे तो किस्सा चला जाणून घेऊ.

हिंदी चित्रपट जगतातील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये माधुरी दीक्षितच्या नावाचा पहिल्यांदा उल्लेख केला जातो. सध्या चित्रपटक्षेत्रात जास्त दिसत नसली, तरी माधुरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर झळकत असते. तिची नवीन ‘द फेम गेम’ वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच सिरीजच्या प्रमोशनसाठी ती कपिल शर्माच्या कार्यक्रमात गेली होती. यावेळी ‘द फेम गेम’ मधील सहकलाकार संजय कपूर, मानव कौर यांनीही कार्यक्रमात धमाल उडवून दिली. कार्यक्रमात माधुरीने अनेक खळबळजनक खुलासे केले जे ऐकून सगळेच चकित झाले.

यावेळी संजय कपूर यांनी माधुरी दीक्षितच्या डान्सबद्दल बोलताना सांगितले की, ती सेटवर यायच्या आधीच ते डान्सचा सराव करायला सुरूवात करायचे. ज्यामुळे त्यांना माधुरी दीक्षितसोबत डान्स करणे सोपे जायचे. यावर कपिल शर्माने माधुरीला “तुमच्या समोर तर सगळे डान्स करताना घाबरतात तुम्ही कोणाला घाबरला आहात का.” यावर उत्तर देताना तिने सांगितले की, एका चित्रपटात बोनी कपूर यांनी प्रभूदेवासोबत डान्स करण्यास सांगितले होते. त्यावेळी मी खूप घाबरले होते. कारण ते खूपच वेगळ्या स्टाइलने डान्स करतात.

माधुरीने याबद्दल पुढे प्रभुदेवा यांचा एक मजेशीर किस्सा सांगितला. हा किस्सा सांगताना ती म्हणाली की “एका चित्रपटात काम करताना पहिल्यांदा तिला प्रभुदेवा कोरिओग्राफ करतील असे वाटले मात्र ते माझ्यासोबत डान्स करायला लागले ज्यामुळे खूप घाबरले. मात्र त्यांनी समजून घेत आपण टप्याटप्याने डान्स करुया” असे सांगितले ज्यामुळे भिती कमी झाली. कार्यक्रमात माधुरीने असेच अनेक किस्से शेअर केले.

Latest Post