Monday, February 9, 2026
Home बॉलीवूड आता भाड्याच्या घरात राहणार माधुरी दीक्षित, किंमत ऐकाल तर चक्रावून जाल!

आता भाड्याच्या घरात राहणार माधुरी दीक्षित, किंमत ऐकाल तर चक्रावून जाल!

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितसारखी जीवनशैली कोणाला नको असते? पण त्या जीवनशैलीसाठी अभिनेत्री किती खर्च करते, याची कल्पना करणेही सामान्य माणसाला अवघड आहे. अभिनेत्री ज्या अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहते त्या अपार्टमेंटच्या भाड्याची किंमत जाणून घेतल्यावर तुमचेही डोळे पांढरे होतील. या किमतीमध्ये, तुम्ही एखाद्या छोट्या फ्लॅटसाठी डाउन पेमेंट देऊ शकता.

माधुरीने भाड्याने घेतलाय फ्लॅट
वरळी येथील इंडियाबुल्स ब्लू स्थित हे अपार्टमेंट माधुरी दीक्षितने पुढील ३ वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे. एका वेबसाईटवर माधुरीच्या अपार्टमेंट आणि भाड्याचे तपशील आहेत. माधुरी दीक्षितने या अपार्टमेंटसाठी ३ कोटी रुपये डिपॉजिट केले असून, प्रत्येक महिन्याला तिला या अपार्टमेंटसाठी १२.५ लाख रुपये मोजावे लागणार आहेत. (madhuri dixit took beautiful flat on rent in mumbai but the rent will you big shock)

साहजिकच एवढ्या किमतीत घर भाड्याने घेण्याची सामान्य माणसाला कल्पनाही करणे अशक्य आहे. पण आधी जाणून घेऊया या अपार्टमेंटची वैशिष्ट्ये काय आहेत? माधुरी दीक्षितचे २९व्या मजल्यावरचे हे अपार्टमेंट ५५०० स्क्वेअर फूट क्षेत्रफळात पसरले आहे. माधुरी दीक्षितच्या या आलिशान फ्लॅटमध्ये ३ खोल्या, सुंदर लॉबी आणि बाल्कनी आहे.

माधुरीचे वर्कफ्रंट
अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती आता मोठ्या पडद्यावर क्वचितच दिसते. ती छोट्या पडद्यावर अनेक रियॅलिटी शोज जज करते आणि त्याच वेळी तिच्या मुलासोबत शास्त्रीय नृत्याचा सराव देखील करते. माधुरी दीक्षितचे चित्रपट एकेकाळी बॉक्स ऑफिसवर राज्य करत होते. तिचे नाव ९० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्रींमध्ये गणले जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दिल तो पागल है’ला २४ वर्षे पुर्ण: कोणाचीही हिंमत नसताना, माधुरीला टक्कर देण्यास तयार झाली होती करिश्मा

-लग्नाच्या रिसेप्शनमध्ये केवळ ‘या’ अभिनेत्याला ओळखू शकले होते श्रीराम नेने, माधुरी दीक्षितने केला खुलासा

-माधुरीच नाही, तर ‘या’ अभिनेत्रीसोबतही इंटिमेट सीन करताना हरपले होते विनोद खन्नांचे भान; पुढे…

हे देखील वाचा