Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड ‘पंचक’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी माधुरी दीक्षितने सिद्धीविनायकाच्या चरणी टेकला माथा, पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाले सासू-सासरे

‘पंचक’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी माधुरी दीक्षितने सिद्धीविनायकाच्या चरणी टेकला माथा, पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद झाले सासू-सासरे

अभिनेत्री माधुरी दीक्षित हीचा पंचक हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे l.तिने मराठीत केलेला हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाच्या आधीच माधुरीने तिच्या कुटुंबासह मुंबईच्या आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतलेले आहे. यावेळी तिच्यासोबत तिचे पती डॉक्टर श्रीराम नेणे तसेच माधुरीची दोन्ही मुले देखील होती. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच माधुरीचे सासू-सासरे देखील सगळ्यांना दिसलेले आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

काही वर्षांपासून माधुरी तिच्या कुटुंबासोबत अमेरिकेत राहत होती. परंतु आता पुन्हा भारतात आलेली आहे आणि तिने कमबॅक देखील केलेले आहे. आज काल तिचे पती श्रीराम नेने देखील चांगलेच लाईमलाईटमध्ये असतात. आता त्यांच्या निर्मिती संस्थेत त्यांचा पंचक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

त्यामुळे त्यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन एक नवीन सुरुवात केलेली दिसत आहे. यावेळी तिच्या सासू-सासर्‍यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. कारण ते पहिल्यांदाच कॅमेरासमोर आलेले आहेत. त्यांचा आहे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सुशांतच्या मृतदेहाचे फोटो पाहून अंकिता लोखंडे झालेली सुन्न; म्हणाली, ‘मला काहीही….
प्रसिद्ध अभिनेत्रीने ऑरीवर साधला निशाण; म्हणाली, ‘हे ऑरी कल्चर खूप खतरनाक आहे’

हे देखील वाचा