Friday, August 1, 2025
Home टेलिव्हिजन मराठमोळ्या माधुरी पवारने लंडनमध्ये नेसली साडी, सोशल मीडियावर रंगलीये एकच चर्चा

मराठमोळ्या माधुरी पवारने लंडनमध्ये नेसली साडी, सोशल मीडियावर रंगलीये एकच चर्चा

देवमाणूस’, ‘तुझ्यात जीव रंगला’ या टीव्ही मालिका आणि सोशल मिडियावरील आपल्या व्हिडिओमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार कायमच चर्चेत असते. मात्र, सध्या ती चर्चेत आली आहे तिच्या लंडनवारी पाेस्टमुळे. माधुरी सध्या नवीन प्राेजेक्टनिमित्य लंडनला गेली आहे आणि तेथील अनुभवा विषयी ती बाेली आहे. माधुरीची ही इंस्टाग्राम पाेस्ट साेशल मीडियावर प्रचंड व्हायरल हाेत आहे. चाहते तिच्या या पाेस्टवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. लंडनमध्ये गेल्यावर काय सांगते माधुरी पवार चला जाणुन घेऊया…

इंस्टाग्रामवर पाेस्ट शेअर करत माधुरी (madhuri pawar) हिने लिहिले, “आयुष्यातली पहिली लंडनवारी जी माझ्या कलेमुळे मला घडली. कला ही देवाने दिलेली देणगी पण त्या देणगीच सोनं करता आलं तुम्हा सगळ्या प्रेक्षकांमुळे आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकामुळे त्यासाठी पहिल्यांदा तुमचे धन्यवाद. आपल्या कलेमुळे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची संधी मिळते आणि त्याच सोनं मी नक्कीच करेन आणि करत आहेच हे काम, जेव्हा तुमच्यासमोर येईल तेव्हा तुम्हाला आवडेल एवढी शास्वती नक्की देऊ शकते.

लंडनमध्ये काम करताना मजा येत आहे वेगळा अनुभव मिळतोय. नवीन टीम सोबत आणि काेआर्टिस्ट बरोबर काम करत आहे सगळेच खूप चांगल काम करतायेत आणि त्यांच्यामुळे माझहि काम चांगल होतय.फक्त तुमच्यापासून थोडं लांब आल्याची जाणीव होते कारण आठवण येते आपल्या घराची, फॅमिली, फ्रेंड्स आणि प्रेक्षकांची दोन्ही देशातल्या वेळेमध्ये फरक असल्यामुळे काॅरडिनेट करता येत नाही.  पण काळजी करू नका मी लवकरच परत येत आहे इथलं काम संपवून.

माधुरी पुढे म्हणाली, “लंडनवारी मधला मजेशीर किस्सा तुमच्याशी शेअर करायचा आहे. खरं, तर आयुष्यात घेतलेली रिस्क होती ती पण माझ्या आवडीसाठी आणि विश लिस्ट मध्ये ही गोष्ट होती म्हणून मला ती करायची होती.
सध्या लंडनमध्ये खूप थंडी आहे (7° to 8°C ) इथली माणसं गुडघ्यापर्यंत बूट, जॅकेट्स, ओव्हरकोट, स्कार्फ,कॅप असं घालून फिरतात. मी घरून येतानाच साडी घेऊन आले होते मला इच्छा होती लंडनमध्ये मी साडी घालून फिरावं कारण साडी हा माझा सगळ्यात आवडीचा पोशाख आहे.

एक दिवस ऑफ मिळाला, तेव्हा सगळ्यांचं ठरलं जरा लंडन फिरून येऊयात मी छान तयार होऊन साडी घालून खाली आले, तेव्हा सगळे शॉक “तू साडी घातलीयेस???” हा प्रश्न होता सगळ्यांचा, तेव्हा वाटलं अरे इथल्या लोकांना माझ्याकडे बघताना ऑकवर्ड, तर नाही वाटणार ना पण मग विचार केला मला भारी वाटतंय ना मग बास आणि इथल्या लोकांना कळावं एक मुलगी साडीमध्ये कशी दिसते आणि स्त्री ची सुंदरता साडीमध्ये कशी बहरते.”

माधुरी पुढे म्हणाली,”आम्ही विंडसर ला गेलो न झालं असं गेल्यापासून परत येईपर्यंत तेथील सगळी माणसं,लहान मुले माझ्याकडे प्रेमाने, कुतूहलाने आणि कौतुकाने बघत होते तेव्हा खूप स्पेशल फिल झालं जास्त स्पेशल, तेव्हा वाटलं काही लोकं यायचे आणि म्हणायचे,”कॅन आय टेक पिक्चर विद यु, यु आर लुकिंग साे बिऊटिफुल.”आणि विचारायचे हे काय आहे याने खूप सुंदर दिसताय तुम्ही. लंडनमध्ये माझी आवड मला जपता आली आणि इथल्या लोकांचा आनंद मला अनुभवता आला त्यांचा प्रतिसाद पाहून खूप छान वाटलं. माझ्या लंडनवारी मधला हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कंमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आमच्या नवीन प्रोजेक्टला आणि टीम ला शुभेच्छा द्यायला विसरू नका.”

माधुरीने नृत्यासाेबत घेतले अभिनयाचे धडे
माधुरी पवारचा जन्म सातारा शहरात झाला आहे. तिने पुण्याच्या महाविद्यालयातून एमबीएची पदवी घेतली आहे. अगोदर पासूनच अभिनय व डान्सची आवड असलेला माधुरीला टिक टॉकमुळे अधिक लोकप्रियता मिळाली होती.  माधुरीचे अनेक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. माधुरीने नृत्यासोबतच अभिनयाचे धडे देखील गिरवले होते. अजय गोगावले यांनी गायलेल्या ‘पावसाळी या ढगांनी’ या म्युजिक व्हिडिओमध्ये ती झळकली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रणवीर अन् बॉस्केटबॉल स्टार शाक यांचा ‘खली बली…’ डान्स चर्चेत, पाहा भन्नाट व्हिडीओ

कपिलच्या इंग्रजीची खिल्ली उडवणाऱ्यांची काॅमेडियनने केली ‘ऐशी तैशी’, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा