×

‘तुझ्यात जीव रंगला’मधील लाडूची चित्रपटात एन्ट्री, ‘या’ दिवशी येतोय दमदार चित्रपट

‘तुझ्यात जीव रंगला’ या झी मराठीवरील मालिकेने घराघरात लोकप्रियता मिळवली होती. या मालिकेची कथा आणि कलाकारांचा दमदार अभिनय, यामुळे प्रत्येकालाच या मालिकेने वेड लावले होते. मालिकेत राणा आणि अंजलीची जोडी तर गाजलीच, त्याचबरोबर बालकलाकार लाडूच्याही भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. लाडूची मनमोहक अदा आणि भाषा यांमुळे त्याने या मालिकेत एक महत्वाची भूमिका मिळवली होती. आता लवकरच तो एका चित्रपटात झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

View this post on Instagram

A post shared by Rajveer (@rajveersinhraje)

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील बालकलाकार राजवीरसिंग गायकवाड (Rajveer Singh Gaikwad) लवकरच चित्रपटात दिसणार आहे. ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘भारत माझा देश आहे’ या चित्रपटात लाडूची म्हणजेच राजवीर सिंगची वर्णी लागली आहे. या चित्रपटात युद्ध भूमीवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबियांच्या कथा उलगडली जाणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने लाडू पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे त्याच्या पहिल्या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्येही असल्याचं पाहायला मिळतं.

View this post on Instagram

A post shared by Rajveer (@rajveersinhraje)

 

‘भारत माझा देश आहे’ असे या चित्रपटाचे नाव असून, चित्रपटाचं दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी केले आहे. निर्मिती एबीसी क्रिएशन प्रस्तुत डॉ. आशिष अग्रवाल हे करत आहेत. हा चित्रपट येत्या ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही कथा एका गावातील आहे, जिथल्या प्रत्येक घरातील व्यक्ती लष्करात आहे. टीव्हीवर झळकलेल्या एका ब्रेकिंग न्यूजनंतर सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांची घालमेल, भीती यात पाहायला मिळणार आहे. चित्रपटात मंगेश देसाई, हेमांगी कवी, शशांक शेंडे, छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आता प्रेक्षकांनाही या चित्रपटाची जोरदार उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post