Wednesday, July 3, 2024

ठरलेल्या वेळेत कर्ज नाही फेडू शकला दाक्षिणात्य सुपरस्टार, मद्रास उच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

सध्या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विशाल (Vishal) चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विशालवर लायका प्रॉडक्शनचे २१ कोटी रुपये थकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे विशालचा ‘वीरमे वागई सूदम’ हा चित्रपट संपूर्ण कर्जाची परतफेड करेपर्यंत कोणत्याही डिजिटल आणि सॅटेलाइट वाहिनीवर प्रसारित होऊ देणार नाही, असा इशारा या प्रॉडक्शन हाऊसने दिला आहे.

अभिनेता विशालवर लायका प्रोडक्शन कंपनीने पैसे बुडवल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मद्रास हायकोर्टाने विशालला लायका प्रॉडक्शनकडून घेतलेल्या कर्जाचे १५ कोटी रुपये मुदत ठेव म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच, कोर्टाने अभिनेत्याला ३ आठवड्यांच्या आत या पेमेंटची पावती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अभिनेता विशालने त्याच्या ‘मरुधू’ चित्रपटासाठी गोपुरम फिल्म्स कडून २१ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. तो वेळेवर रक्कम भरू शकला नाही म्हणून अभिनेत्याने नंतर लायका प्रॉडक्शनला त्याचे कर्ज फेडण्यास सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने डिसेंबर २०२० पर्यंत पैसे देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, सर्वांना आश्चर्य वाटले की, विशालने हप्त्यापेक्षा जास्त कर्जाची परतफेड केली नाही. म्हणून लायका प्रॉडक्शनने त्याला नोटीस पाठवली.  जेव्हा त्याने उत्तर दिले नाही, तेव्हा प्रॉडक्शन हाऊसच्या वतीने मद्रास उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. यापूर्वी ऑगस्ट २०२१ मध्ये, मद्रास उच्च न्यायालयाने लायका प्रॉडक्शनला योग्यता नसलेला अर्ज दाखल केल्याबद्दल ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता आणि आता विशालवर प्रॉडक्शनने कारवाई केली आहे. सध्या या प्रकरणाची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे.

हेही वाचा- 

हे देखील वाचा