Thursday, June 13, 2024

गुड न्यूज! अभिनेत्री मानसी बनली आई! पण कुणालाच खबर नाही? अखेर अभिनेत्रीनेच केले फोटो शेअर

मराठी मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री मानसी ही आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मानसी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ पाहून चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. सध्या मानसीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. जी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

मानसीने स्वतः सोशल मीडियावर एक बातमी शेअर केली. तिने पोस्ट करताना लिहिले, “आम्ही आई-बाबा झालो आहोत. आमच्या आयुष्यात नवीन आनंद आला आहे. आमच्या मुलीला तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादांची गरज आहे.” तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

मानसी शर्माने (Mansi Sharma)  2019 मध्ये व्यवसायाने उद्योजक असलेल्या अभिषेक शर्माशी लग्न केले होते. तिला याआधी एका मुला झाला आहे. ती आता दुसऱ्यांदा आई झाली आहे. अभिनेत्री मानसी शर्मा हिने छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. तिने “छोटी सरदारनी” या लोकप्रिय टीव्ही मालिकांमधील भूमिकांसाठी विशेष प्रसिद्धी मिळवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mansi Sharma (@mansi_sharma6)

मानसी शर्माच्या कामाविषयी बोलायचं झाले तर, मानसी शर्माने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 2013 मध्ये “महाभारत” या टीव्ही मालिकेतून केली.ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आणि मानसी शर्माला घराघरात ओळख मिळाली. तिने काही हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या “अच्छा दिन” या मराठी चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने “बृजमोहन अमर रहे” ,”अमांनत”, “बेगम जान” आणि “गिन्नी वेड्स सनी” या चित्रपटांमध्ये काम केले. (Mahabharat fame actress Mansi Sharma became a mother for the second time photo viral on social media)

अधिक वाचा-
सिनेसष्टीवर दु:खाचा डोंगर! ‘या’ दिग्गज चित्रपट निर्मातीचे निधन, 2019मध्ये नकारलेला ‘पद्मश्री’
‘सचिनची बॅट आमची आहे …’, संकर्षण कऱ्हाडेने सातासमुद्रापार अमेरिकेत सादर केली जबरदस्त कविता

हे देखील वाचा