Wednesday, July 3, 2024

महाभारताचे कृष्ण नितीश भारद्वाज यांची IAS पत्नीविरुद्ध पोलिसात धाव; नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध मालिका ‘महाभारत’मध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेता नितीश भारद्वाज (Nitish Bhardvaj) सध्या चर्चेत आले आहेत. नितीश भारद्वाज यांनी एक्स IAS पत्नीविरुद्ध पोलिसात धाव घेतली आहे. पत्नीवर केला मानसिक छळाचा गंभीर आरोप भारद्वाज यांनी केला आहे. त्यामुळे सिनेसृष्टीत चांगलीच खळबळ माजली आहे.

नितीश भारद्वाज यांच्या पत्नी स्मिता गटे मध्य प्रदेश मानवाधिकार आयोगामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. नितीश भारद्वाज यांनी पत्नीविरोधात पोलिसात तक्रार करत तिच्याविरोधात कारवाई करण्याची मागणीही केली आहे. २००९ मध्ये दोघे विवाहबंधना अडकले होते. त्यांच्या लग्नाला १२ वर्षे झाली आहेत आणि २०१८ मध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. हे प्रकरण अजूनही न्यायालयात आहे.

भारद्वाज यांनी तक्रारीत काय म्हटले आहे?
भारद्वाज यांनी भोपाळ पोलिस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा यांच्याशी 14 फेब्रुवारी रोजी याप्रकरणी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्नीविरोधात लेखी तक्रार दिली. या तक्रारीमध्ये त्यांनी स्मिताने त्यांना त्यांच्या जुळ्या मुली देवयानी आणि शिवरंजनी यांना भेटू देत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच, मानसिक छळाचा गंभीर आरोप भारद्वाज यांनी केला आहे. पोलिसांना याचा तपास करण्याची विनंती केली आहे.

नितीश यांनी त्यांच्या एका जुन्या मुलाखतीत घटस्फोट हे मृत्यूपेक्षाही वेदनादायी असल्याचे सांगितले होते. घटस्फोटाबाबत बोलताना ते म्हणाले होते की, ‘होय, आम्ही फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. आमच्या विभक्त होण्याचे खरे कारण काय आहे. मला त्या तपशीलात जायचे नाही. आमचा खटला अजूनही न्यायालयात सुरू आहे. नितीश आणि स्मिता यांचे हे दुसरे लग्न आहे. मनिषा पटेल ही त्यांची पहिली पत्नी होती. त्यांचे लग्न १९९१ मध्ये झाले होते. २००५ मध्ये दोघे वेगळे झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

जय बच्चन यांच्याकडे १५ कोटींची प्रॉपर्टी, ४० कोटीचे दागिने अन्…बच्चन परिवारात कोणाकडे अधिक संपत्ती?
मोठ्या मनाचे अनुपम खेर ! तो व्हिडीओ पाहून तुमच्याही चेहऱ्यावर उमटेल हसु

हे देखील वाचा