‘तुझ संग प्रीत लगाई साजना’, ‘देवों का देव महादेव’, ‘देव’ अशा अनेक मालिकेत अभीनेत्री पूजा बनर्जीने काम केले आहे. याशिवाय ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’, ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’, ‘झलक दिखला जा’ अशा अनेक रिएलिटी शोमध्ये झळकली आहे. तसेच ती अनेक बंगाली चित्रपटात दिसली आहे. पूजा पडद्यावर नेहमीच साध्या-सोबर मुलीची भूमिका साकारताना दिसली आहे, परंतु वास्तविक जीवनात पूजा खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.
पौराणिक टीव्ही शो ‘देवों के देव महादेव’ (Devon Ke Dev Mahadev)मध्ये माता पार्वतीची भूमिका साकारून घराघरात आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री पूजा बॅनर्जी (Pooja Banerjee) प्रचंड लोकप्रिय आहे. अर्थात, अभिनेत्री पडद्यावर नेहमीच साध्या-सरळ मुलीची भूमिका साकारताना दिसली होती, परंतु वास्तविक जीवनात पूजा खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.तिच्या सोशल मीडिया पेजवर तिचा बोल्डनेस स्पष्टपणे पाहायला मिळतो. पूजा तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. आता पूजा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
पूजाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच खूप बोल्ड आणि हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये पूजा रेड कलरच्या बॉडी फिट ड्रेसमध्ये दिसत आहे. यासोबतच पूजाने निळ्या रंगाच्या ओव्हरकोटसह तिचा हा लुक केला आहे. कधी सोफ्यावर बसून तर कधी आडवे पडून पूजा एकापेक्षा एक बोल्ड पोज देताना दिसत आहे. यासोबतच या अभिनेत्रीने लाऊड न्यूड मेकअपने तिची चमक आणखी वाढवली. अभिनेत्रीच्या या सुंदर फोटोंना तिच्या चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. चाहत्यांव्यतिरिक्त, सर्व नेटकरी सतत कमेंट करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर या फोटोला लाखो लाईक्स मिळाले आहेत.
हेही वाचा –
श्रीदेवीलाही सौंदर्यात मागे टाकते बहिण श्रीलता, ‘या’ कारणाने राहिली सिनेजगतापासून दूर
दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केले अभिनेत्री सुष्मिता सेनचे समर्थन, म्हणाले ‘ती एक …’
शाप, हत्या की, गोळ्यांपुढे कमजोर ठरला मार्शल आर्ट किंग? जाणून घ्या ब्रूस लीच्या मृत्यूचे रहस्य