Thursday, April 25, 2024

दिग्दर्शक महेश भट्ट यांनी केले अभिनेत्री सुष्मिता सेनचे समर्थन, म्हणाले ‘ती एक …’

सुष्मिता सेन( Sushmita Sen) आणि ललित मोदी (lalit Modi) यांच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या आहेत. अजूनही, लोक त्यांच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया देत आहेत. सुष्मिता-ललित मोदी, यांनी ट्रोलर्सला उत्तरही दिलं आहे. अनेक सेलेब्रिटी सुष्मिताच्या सपोर्टमध्ये उभे राहीले आहेत. काही दिवसांपूर्वीच, निर्माते विक्रम भट्ट यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. आता चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनी, सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या नात्याबद्दल आपले मत मांडले आहे. विश्वसुंदरी ते अभिनेत्री, असा प्रवास केलेली सुष्मिता सेन आणि तिचा व्यावसायिक बॉयफ्रेंड ललित मोदी यांच्या नात्याबद्दल आपले विचार मांडत, त्यांना ट्रोल करणार्यांची खिल्ली उडवली आहे. सोबतच त्या काळाचीही आठवण केली आहे जेव्हा सुष्मिता निर्माते विक्रम भट्ट यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती.

सुष्मिताची केली भरभरून स्तुती – 
महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते कि, सुष्मिता ‘एक असामान्य मुलगी’ आहे आणि ते तिच्या ‘स्वतत्वावर जीवन जगण्याच्या वृत्तीला’ सलाम करतात. त्यांचे म्हणणे आहे की, प्रत्येकाला आपले आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगण्याचा हक्क आहे आणि कोणीही स्वतःचे विचार इतरांवर थोपवू नये. सुष्मिता बद्दल पुढे ते म्हणाले की, “ती एक अशी व्यक्ती आहे जिने नेहमीच आपल्या मनाचं ऐकलं आहे.”

विक्रम भट्ट सोबतच्या नात्याची केली आठवणः
सुष्मिता बद्दल बोलताना, महेश भट्ट यांनी त्या काळाची आठवण केली आहे जेव्हा, सुष्मिता आणि विक्रम भट्ट (Vikram Bhatt) रिलेशनशिपमध्ये होते. सुष्मिता तिचा पहीला सिनेमा ‘दस्तक’ची शूटिंग करत असताना तिची आणि विक्रमची जवळीक वाढली. ते सांगतात की, विक्रम जणू त्यांची उजवा हातच होता आणि सुष्मिता सोबत काम करताना ते एकमेकांवर प्रेम करू लागले.

काय म्हणाले होते विक्रम भट्ट – 
काही दिवसांपूर्वीच निर्माते विक्रम भट्ट यांनी सुष्मिता-ललित मोदी (Sushmita Sen Lalit Modi Relationship) यांच्या नात्याबद्दल आपले मत मांडले होते. त्यांनी सुष्मिताला गोल्ड डिगर म्हणणाऱ्यांना चांगलेच फटकारले होते. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते कि, “कोणाच्याही प्रेमात पडण्याआधी त्याचा बँक बॅलेंस पाहणारी सुष्मिता नक्कीच शेवटची व्यक्ती असेल. माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. मी ‘गुलाम’ दिग्दर्शित करत होतो, पण माझ्याकडे पैसे नव्हते. मी कधीही विसरणार नाही की, मला युएसला घेऊन जाणारी सुष्मिता ही पहिलीच व्यक्ति होती. तीनेच माझा सगळा खर्च केला होता. जेव्हा आम्ही लाॅस एंजेलिसमध्ये पोहोचलो, तेव्हा तिथे एक लिमोजिन कार (Limousine) होती. मी एकदम चकित झालो होतो. ती म्हणाली की, तिला माझी युएसमधली एंट्री स्पेशल बनवायची होती.” विक्रम- सुष्मिता यांनी जवळपास २ वर्षे एकमेकांना डेट केलं. १९९६मध्ये दोघांचेही रस्ते वेगळे झाले होते.

हेही वाचा –

प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला ‘इमर्जन्सी’ चित्रपट, रिलीज होण्यापूर्वी चित्रपट दाखवण्याची कॉंग्रेसची मागणी

गायक झुबिन गर्ग मिरगीच्या झटक्यामुळे रुग्णालयात दाखल, प्रकृती चिंताजनक!

‘मिशन मंगल’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत, मल्याळी अभिनेत्यावर करतेय जीवापाड प्रेम

 

हे देखील वाचा