Wednesday, July 3, 2024

मराठी सिनेसृष्टीला नवसंजीवनी देण्यासाठी एकनाथ शिंदे सरकारचा मोठा निर्णय, देणार विविध प्रकारचे अनुदान

मधल्या काही काळापासून मराठी मनोरंजनविश्वात अनेक उत्तम सिनेमे बनत आहे. अतिशय आगळे वेगळे विषय घेऊन उत्तम कलाकृती या इंडस्ट्रीमध्ये तयार होतात. म्हणूनच मराठी चित्रपटांची भुरळ अनेक दिग्गज लोकांना नेहमीच पडत असते. मात्र असे असूनही मराठी प्रेक्षक या चित्रपटांकडे पाठ फिरवतात किंवा त्यांना हिंदी चित्रपटांच्या तुलनेत थियेटर मिळत नाही आणि थियेटर मिळाले तर शो मिळत नाही. अशा अनेक अडचणींवर मत करत मराठी चित्रपट टिकाव धरतात. पण आता मराठी चित्रपटांना आणि मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना अडचणींमधून बाहेर काढत हे सिनेमे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कंबर खोचली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रकारे मराठी सिनेसृष्टीला मदत करण्याची तयारी दाखवली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, आता मराठी चित्रपटांना केवळ तीन महिन्याच्या आत शासकीय अनुदान मिळणार आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित तयार होणाऱ्या सिनेमांसाठी सोबतच अन्य विषयांवरील प्रेरणादायी सिनेमांसाठी सरकारकडून एक कोटीचे अनुदान देण्यात येणार आहे. जे मराठी चित्रपट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जातात आणि कौतुकास पात्र ठरतात त्यांना दुप्पट अनुदान देण्यात येणार आहे.

eknath-shinde

मुख्य म्हणजे महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाने ‘फिल्मी बाजार’ ही वेबसाइट तयार करण्याची घोषणा केली असून, या वेबसाइटच्या निर्मिती प्रक्रियेत अभिनेता स्वप्नील जोशी, दिग्दर्शक महेश कोठारे आणि संजय जाधव आदी दिग्गज सहभागी होणार आहेत. मराठी चित्रपट प्रदर्शनानंतर निर्मात्यांना आर्थिक नुकसान झाल्यास त्यांना काही मदत करता येऊ शकते का याचा देखील अभ्यास केला जाणार आहे.

मराठी चित्रपटांची निर्मिती करताना कोणत्याही क्षणी काहीही अडचण आली तर महाराष्ट्र्र शासन त्यांना मदत करणार असून, आलेली अडचण सोडवायचा प्रयत्न देखील करणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मराठी निर्मात्यांना आणि दिगदर्शकांना मोठा दिलासा मिळाला असून, यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळत ते जास्तीत जास्त उत्तम चित्रपटांची निर्मिती करू शकणार आहे. या निर्माणयामुळे मराठी मनोरंजनविश्वातील अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याच्या अडचणी संपता संपेना, आईला भेटण्यासाठी सख्या भावानेच दिला नकार
देसी अंदाजमध्ये हरयाणवी क्वीन सपना चौधरीने केले लोकांना घायाळ, व्हिडिओ झाला व्हायरल

हे देखील वाचा