महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देण्यासाठी ‘जागरुकता अभियाना’ची सुरुवात केली आहे. मात्र, असे करूनही मुस्लिम भागामध्ये लसीकरणाची संख्या वाढत नाहीये. अशामध्ये आता महाराष्ट्र सरकारने यासाठी सलमान खानची मदत घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे की, सरकार बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मदत घेईल, जेणेकरून नागरिकांना लसीकरण पूर्ण करण्यासाठी राजी केले जाईल.
टोपे म्हणाले की, “खरं तर, चित्रपट अभिनेते आणि धार्मिक नेत्यांचा लोकांवर चांगला प्रभाव असतो आणि लोक त्यांचे शब्द पाळतात. महाराष्ट्रात लस मिळण्याची गती काही भागात मंद आहे. लसीबाबत लोकांमध्ये असलेली भीती निराधार आहे. एखाद्या व्यक्तीला लसीची गरज नाही किंवा ही लस त्याच्यासाठी फायदेशीर नाही, असा विचार करणे ही अंधश्रद्धा आणि अज्ञान आहे. ते दूर करणे आवश्यक आहे.”
प्रत्येकाने नोव्हेंबरपर्यंत पहिला डोस घ्यावा
टोपे यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत १०.२५ कोटींहून अधिक लसी देण्यात आल्या आहेत आणि नोव्हेंबरच्या अखेरीस प्रत्येकाला किमान एक डोस मिळावा अशी आमची इच्छा आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेबाबत टोपे म्हणाले की, साथीचे चक्र सात महिन्यांचे असले, तरीही मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यामुळे तिसरी लाट फारशी तीव्र होणार नाही. कोव्हिड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यासोबतच लोकांनी लस घ्यावी.
कोव्हिशिल्डमधील अंतर कमी करणे आवश्यक
टोपे म्हणाले की, “लसीकरणाची मोहीम वाढवायची असेल, तर राज्यात कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करावे लागेल. कोव्हॅक्सिनच्या दोन डोसमधील फरक २८ दिवसांचा आहे, तर कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील फरक ८४ दिवसांचा आहे. ही तफावत कमी करता येईल का? महाराष्ट्राने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. याशिवाय आम्ही केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्याशीही बोललो आहोत. यामध्ये आयएमसीआर आणि त्यावर संशोधन करणाऱ्या इतर संस्थांचे मत महत्त्वाचे ठरणार आहे.”
सलमान खानच्या हस्तक्षेपानंतर लसीकरणाच्या संख्येत वाढ होते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मेहुणा आयुष शर्माला सलमान खानसोबत ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’मध्ये करायचे नव्हते काम, केला खुलासा
-श्रद्धा आर्याला उचलून घेऊन मंडपात पोहोचला पती राहुल, वधू-वरावर खिळल्या सर्वांच्याच नजरा