Wednesday, April 17, 2024

‘राम सेतू’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला आली आईची आठवण, व्हिडिओ पाहून तुमचेही पाणावतील डोळे

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सतत स्वत:ला कामात व्यस्त ठेवणे पसंत करतो. अक्षय कुमार सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘राम सेतू’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगदरम्यान तो आपल्या सहकलाकारांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करतो, पण आता अक्षयने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून तुम्हीही भावुक व्हाल. खरं तर, व्हिडिओमध्ये अक्षय कुठेतरी हरवलेला दिसत आहे.

अक्षयने हा भावनिक व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना अक्षयने लिहिले, “हो… आज आईला खूप मिस करत आहे.” यासोबतच अक्षयने तुटलेल्या हृदयाचा इमोजी वापरला आहे. व्हिडिओमध्ये वाऱ्यामुळे अक्षयचे केस विखुरले दिसत आहेत. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला ‘नमस्तसाय नमो नमः’ हे धार्मिक गाणे वाजत आहे. (Superstar Akshay Kumar Is Missing His Mother Actor Share Emotional Video)

यावर्षी ८ सप्टेंबर रोजी अक्षयची आई अरुणा भाटिया यांचे निधन झाले होते. आईच्या निधनाची माहिती देताना अक्षयने ट्वीट केले होते की, “ती माझी ताकद होती आणि आज तिच्या जाण्याने मी दु:खी झालो आहे. माझी आई अरुणा भाटिया आम्हा सर्वांना सोडून माझ्या वडिलांना भेटणार आहे.”

अक्षय त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात गेला होता. अक्षयची आई काही दिवसांपासून आजारी होत्या आणि त्यांची प्रकृती अधिकच नाजूक झाल्यानंतर तो त्याच्या आईला भेटण्यासाठी भारतात आला. मात्र, अक्षय आल्यानंतर काही दिवसांनी त्याच्या आईचे निधन झाले.

अक्षयने आईसोबतच्या नात्यावर केले भाष्य
माध्यमांना २०१५ मध्ये दिलेल्या मुलाखतीत अक्षयने त्याच्या आईसोबतच्या नात्याबद्दल सांगितले होते की, “माझ्या आणि आईमध्ये खूप प्रेमळ आणि मजबूत नाते आहे. आमच्यामध्ये काहीही येऊ शकत नाही. आम्ही कितीही दूर असलो, तरी मनाने नेहमीच जवळ असतो. तिच्याशिवाय मी काही नाही.”

आगामी चित्रपट
अक्षय सध्या दमणमध्ये ‘राम सेतू’चे शूटिंग करत आहे. त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय अक्षय ‘पृथ्वीराज’, ‘अतरंगी रे’ आणि ‘बच्चन पांडे’ या चित्रपटातही दिसणार आहे. नुकताच ‘पृथ्वीराज’चा टिझर प्रदर्शित झाला असून, त्याला खूप पसंती मिळत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातून मानुषी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मेहुणा आयुष शर्माला सलमान खानसोबत ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’मध्ये करायचे नव्हते काम, केला खुलासा

-श्रद्धा आर्याला उचलून घेऊन मंडपात पोहोचला पती राहुल, वधू-वरावर खिळल्या सर्वांच्याच नजरा

-वीर दासच्या वक्तव्यावर भडकली कंगना; थेट दहशतवादाशी तुलना करत, केली कडक कारवाईची मागणी

हे देखील वाचा