Saturday, June 29, 2024

अमोल कोल्हेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, “राज्य सरकारचा ‘हा’ नियम थिएटर व्यावसायाच्या मुळावर घाव घालणारा”

कोरोनाचा कहर कमी झाल्याने हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे सरकारने पाबंदी घातलेली सार्वजनिक ठिकाणं देखील लोकांच्या वापरासाठी खुली करण्यात येणार आहे. कोरोनाचे सर्व नियम आणि अटींचे पालन करून या ठिकाणांना खोलण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. येत्या २१ तारखेपासून राज्यातील चित्रपट आणि नाट्यगृह देखील चालू होत आहे. या निर्णयामुळे सर्वच कळकरांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र ही चित्रपट आणि नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरु होणार असल्याने दुसरीकडे काहींच्या मनात अजूनही निराशा आहे.

अशातच राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंना पत्र लिहिले आहे. राज्यातील थिएटर्स १०० टक्के क्षमतेने सुरु करा, अशी मागणी त्यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे. ५० टक्के क्षमतेने नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्यास सरकारने परवानगी दिलेली आहे. परंतु राज्य सरकारने हा निर्णय मागे घेऊन राज्यातील थिएटर्स १०० टक्के क्षमतेने सुरु करावेत अशी विनंती अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. याचे कारण म्हणजे कोरोना काळात असणाऱ्या लॉकडाऊनमुळे आणि सर्व चित्रीकरणं बंद असल्याने कलाकारांची आर्थिक स्थिती आधीच नाजूक आहे. त्यामुळेच सरकारने राज्यातील थिएटर्स १०० टक्के क्षमतेने सुरु करुन कलाकारांना दिलासा द्यावा, असे त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.

अमोल कोल्हे यांनी त्यांच्या पत्रात असेही म्हटले आहे की, दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी सरकारने सार्वजनिक वाहतूक, बस, ट्रेन, मॉल्स सुरु केले आहेत, मग नाट्यगृह आणि चित्रपटगृह ५० टक्के क्षमतेने का? आधीच डबघाईला आलेल्या या क्षेत्रावर उपजीविका करणाऱ्या असंख्य लोकांना दिलासा मिळेल. सरकारने दोन डोस घेतलेल्या सर्व नागरिकांना १०० टक्के आसनक्षमतेसह नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करावी.

नुकतेच सरकारने शाळा आणि मंदिरं सुरू केले असून लवकरच नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हे पात्र लिहिले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

ठरलं तर! अखेर ‘या’ तारखेपासून राज्यातील चित्रपटगृहे होणार सुरू; प्रशासनाकडून एसओपीही जारी

आनंदाची बातमी! सुबोध भावे ‘या’ चित्रपटातून पहिल्यांदाच झळकणार शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

‘बिग बॉस मराठी’च्या एका एपिसोडसाठी मांजरेकर घेतात ‘एवढे’ लाख; आकडा वाचून उंचावतील तुमच्याही भुवया

हे देखील वाचा