Friday, July 5, 2024

राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेत दाखवलेल्या चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

महाराष्ट्र नवनिर्माणन सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) राजकारणात असले तरी त्यांचा मनोरंजन आणि चित्रपट जगताशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध संपूर्ण राज्याला परिचित आहे. मराठी चित्रपट जगतातील अनेक कलाकारांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संंबंध आहेत. सिने जगतातील कोणताही प्रश्न असो, राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते नेहमीच तो सोडवण्यासाठी महत्वाची भूमिका निभावत असतात. नुकतीच राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेची राज्यभरात चर्चा झाली. त्याचप्रमाणे या सभेत एका मराठी चित्रपटाचा ट्रेलरही दाखवण्यात आला. कोणता होता तो चित्रपट चला जाणून घेऊ.

राज ठाकरे यांची औरंगाबादमधील चर्चा सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. राज ठाकरे यांनी विविध विषयांवर केलेल्या सडेतोड वक्तव्यांंमुळे ही सभा गाजलीच. त्याचप्रमाणे या सभेत दाखवलेल्या शाहीर साबळेंच्या चित्रपटाच्या ट्रेलरलाही उपस्थित जनसमुदायाने जोरदार प्रतिसाद दिला. ‘महाराष्ट्र शाहीर’ असे या चित्रपटाचे नाव असून, त्याचे दिग्दर्शन केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केले आहे. औरंगाबादमधील सभेत या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhary) या चित्रपटात कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांची भूमिका साकारणार आहे. अजय अतुल या प्रसिद्ध गायकांचा आवाज या चित्रपटाला लाभलेला आहे. हा बहुचर्चित चित्रपट पुढील वर्षी २८ एप्रिल २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शाहीर साबळे हे प्रसिद्ध गीतकार, संगीतकार कुशल ढोलकी वादक आणि दिग्दर्शक होते. महाराष्ट्राची लोकधारा द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीला त्यांनी समाजात ओळख मिळवून दिली. त्यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गाणे चांगलेच लोकप्रिय ठरले होते. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्र मुक्ती लढ्यात महत्वाचे योगदान दिले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा