मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा‘ फेम प्रसिद्ध अभिनेत्री वनिता खरात सध्यातिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचे हळदी आणि मेहंदीच्या फोटोंनी धुमाकुळ घातला आहे. अशातच अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने वनिता खरातला लग्नासाठी एक खास भेट वस्तू आणली आहे ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मराठमोळी कॉमेडियन आणि अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) हिने अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटलवला आहे. वनिता लवकरच तिचा बाॉयफ्रेंड सुमित लोंढे (Sumit Londhe) विवाह बंधनात अडकणार आहे आहे. नुकतच तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. वनिताने तिच्या अधिकृत इंस्टग्राम अकाउंटवर मेहंदीचे फोटो शेअर केले होते, तर नुकतच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये प्रजाक्ता माळी (Prajakta Mali) पाहायला मिळत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्राजक्त सुरुवातीला वनितासोबत लग्नाच्या गप्पा मारताना दिसून येते आणि नंतर तिला ‘प्राजक्तराज’ मधील सोनसळा या प्रकारातील दागिन्यांचे संपूर्ण कलेक्शन भेट म्हणून दिले आहे. यामध्ये तोडे, बेलपानटीक, वर्जटीक असे विविध दागिने दिले आहेत. हे गिफ्ट मिळाल्यानंतर वनितााचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तिला प्राजक्ताचं गिफ्ट खूपच आवडलेलं दिसत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ शेअर करत प्राजक्ताने खास कॅप्शन देत लिहिले की, “वनिता…तुझ्यावर सोनसळा कलेक्शन अत्यंत शोभून दिसेल याची खात्री आहे मला…तुला तुझ्या वैवाहिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.” त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी देखिल कमेंटचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिले की, ‘तू दहा वर्षांपूर्वी प्राजक्तराज काढायला हवं होतंस, यासाठी आता परत लग्न करावं लागेल’, तर दुसऱ्याने लिहिले की, ‘मला सांगा कुठे मिळतेय हेय सर्वे दागिने’, असं म्हणते त्यांनी प्राजक्तालाच वेगवेगळे सल्ले द्यायला सुरुवात केली आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘कार्टून नेटवर्क’ म्हणत नेटकऱ्यांनी उडवली उर्फी जावेदच्या जीन्स लूकची खिल्ली
मुलीच्या जन्मानंतर आलियाच्या करिअरला लागणार ब्रेक? अभिनेत्रीने केला खुलासा