Tuesday, April 16, 2024

मुलीच्या जन्मानंतर आलियाच्या करिअरला लागणार ब्रेक? अभिनेत्रीने केला खुलासा

बाॅलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट अनेकदा मीडियाच्या चर्चेत असते. आजकाल ती मदरहुडचा आनंद घेत आहे. गेल्या वर्षी आलियाने नोव्हेंबरमध्ये मुलगी राहा कपूरला जन्म दिला. अशात आलियाचे चाहते तिला लवकरात लवकर पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. अलीकडेच आलियाने तिच्या वर्क लाईफ बॅलन्सबाबतच्या योजनांबद्दल सांगितले. ती आपली मुलगी आणि कुटुंबाची जबाबदारी कशी पेलणार? या बाबत ती बाेली…

नुकत्याच झालेल्या एका संवादादरम्यान आलिया (alia bhatt) हिला विचारण्यात आले की, कौटुंबिक जीवनावर लक्ष केंद्रित केल्यामुळे तिची कारकीर्द मंदावली आहे का? यावर ती म्हणाली, ‘माझे प्रायोरिटी बदलली आहेत. सध्या माझ्या आयुष्यातील पहिली प्रायोरिटी माझी मुलगी आहे. पण, चित्रपट हे माझे पहिले प्रेम आहे. मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. कदाचित क्वांटिटीऐवजी क्वालिटी वर लक्ष केंद्रित केले जाईल, जी वाईट गोष्ट नाही.

आलिया भट्टचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात आलिया या गोष्टी बोलताना दिसत आहे. आलियाचे म्हणणे ऐकून युजर्सच्या खूप मनोरंजक प्रतिक्रिया येत आहेत. सर्वजण अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘मुलीला जन्म दिल्यानंतर तुम्ही इतक्या लवकर नॉर्मल लाइफमध्ये परत आला आहात. तुम्ही एक प्रेरणा आहात.’ युजर्स आलियाच्या ग्लो आणि फिटनेसचेही कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आलिया शेवटची ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. या चित्रपटाने जगभरात सुमारे 400 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. अलीकडेच शाहरुख खानच्या ‘पठाण’ने ‘ब्रह्मास्त्र’चा रेकॉर्ड मोडला आहे. यावर आलिया म्हणाली, ‘आम्ही खूप आनंदी आहोत. ‘पठाण’ हा नुसता ब्लॉकबस्टर नाही तर कदाचित भारतीय सिनेमातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरेल. आम्ही या क्षणासाठी आभारी आहोत आणि प्रार्थना करतो की, ते असेच चालू राहील. प्रत्येक नवीन चित्रपट असेच रेकॉर्ड तोडत राहाे.’ आलियाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले. तर आलिया लवकरच ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये ती कॅटरिना कैफ आणि प्रियांका चोप्रासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.(bollywood actress alia bhatt opens up on balancing work life after raha birth says my first priority is my daughter)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांची भन्नाट केमिस्ट्री असणाऱ्या ‘शिव शास्त्री बलबोआ’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

‘आई झाल्यानंतर सपनाचं करिअर संपलं’ म्हणणाऱ्यांची सपना चौधरीने घेतली शाळा; म्हणाली…

हे देखील वाचा