Saturday, June 29, 2024

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांनी हाती बांधले घड्याळ, केला राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ

कलाकारांनी राजकारणात यावे ही काही नवीन नाही. आजपर्यंत अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश करत त्यांच्या नवीन इंनिंगला सुरुवात केली आहे. मराठीमधील अनेक कलाकारांनी राजकारणात प्रवेश केला आहे. यातच आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम विनोदवीर-अभिनेते प्रभाकर मोरे यांनी देखील राजकारणात प्रवेश करत त्यांच्या नवीन इंनिगला सुरुवात केली आहे. अभिनेते प्रभाकर मोरे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, अजित पवारांच्या उपस्थित त्यांनी घड्याळ हाती बांधले आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रवेश केल्यानंतर लगेच त्यांना सांस्कृतिक कोकण विभागाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट देखील करण्यात आले आहे. यात लिहिले आहे की, “प्रभाकर मोरे यांची कोकण विभागीय सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षपदी यावेळी नियुक्ती करण्यात आली. पक्षाची ध्येय-धोरणे जनमानसात रूजवण्याचा प्रयत्न प्रभाकर मोरे करतील, असा विश्वास अजितदादांनी व्यक्त करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.” सोबतच त्यांच्या पक्षप्रवेशाचा फोटो देखील ट्विट केला गेला आहे.

या पक्षप्रवेशांतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, “कलाकारांच्या व्यथा मांडण्यासाठी आणि कोकणातील कला संस्कृतीत काही अडचणी आहेत. त्यामध्ये मदत करण्यासाठी, व्यवस्थित मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या कोकणी भाषेतील बोलीने आणि विनोदांनी स्वतःची एक वेगळी ओळख तयार केली. प्रभाकर मोरे हे मूळचे रत्नागिरीचे असून, मागील अनेक वर्षांपासून ते मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. मोरे यांनी सुप्रसिद्ध निर्माते आणि लेखक संतोष पवार यांच्या नाटकांतून रंगभूमीवर पदार्पण केले होते. त्याने अनेक नाटकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

तत्पूर्वी मागील काही काळामध्ये मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यात प्रिया बेर्डे, प्रियदर्शन जाधव, सविता मालपेकर, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, आसावरी जोशी, सुरेखा कुडची, विजय पाटकर, सिद्धेश्वर झाडबुके, प्रियदर्शन जाधव, संभाजी तांगडे, वैशाली माडे आदींचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पडद्यावरची पार्टनर ते आयुष्यभराची अर्धांगिनी, ‘अशी’ होती रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी

सुकेशच्या आधी चाहत खन्नाचे नाव जाेडले गेले ‘या’ प्रसिद्ध गायकासोबत; 2 घटस्फाेटानंतर कुठे आहे अभिनेत्री?

 

हे देखील वाचा