आपण अनेकदा असे म्हणतो किंवा ऐकतो की समोरच्याला रडवणे खूप सोपे आहे, मात्र हसवणे खूपच अवघड. हसणे आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. आजच्या घडीला आपण पाहिले तर टेलिव्हिजनवर अनेक कॉमेडी शो सुरु आहेत. मात्र या सर्वांमध्ये सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाने एक वेगळीच छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे. या कार्यक्रमामध्ये लोकांना हसवण्याचा काम करणाऱ्या सर्वच कलाकारांनी त्यांची एक वेगळी ओळख आणि एक वेगळी जागा दर्शकांच्या मनात तयार केली आहे. गौरव मोरे, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, समीर चौगुले आदी सर्वच कलाकारांनी आज त्यांचा एक फॅन बेस तयार केला आहे.
महाराष्टरची हास्यजत्रा कार्यक्रमात काम करणारे जवळपास सर्वच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. ते नेहमीच विविध पोस्ट शेअर करत फॅन्सच्या संपर्कात असतात. या सोशल मीडिया पोस्ट देखील या कलाकरांना मोठ्या प्रमाणावर प्रकाशझोतात आणतात. आता या शोमधील अभिनेता असलेल्या गौरव मोरेने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक वेगळी पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट अनेक लोकांच्या आयुष्याला काहीशी साधर्म्य असलेली आहे.
गौरव मोरेच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याचा फॅन असलेल्या एका व्यक्तीने एक मेसेज सेंड केला आहे. याच मेसेजचा फोटो त्याने त्याच्या स्टोरीवर पोस्ट केला असून, सध्या त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे त्या फॅनने त्याचा मेसेज हिंदीमध्ये लिहिला असल्यामुळे कदाचित तो हिंदी भाषिक असावा असा देखील अंदाज लावला जात आहे. त्या फॅनने त्याच्या मेसेजमध्ये लिहिले आहे की, “हॅलो सर, मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील. मी एका मेडिकलमध्ये १२ तास काम करतो आणि जेव्हा घरी येतो, त्यानंतर मला आयुष्य खूप कंटाळवाणे वाटते. कधी कधी तर हे जीवनच संपवून टाकावे असा विचार येतो. मात्र जेव्हा रात्री टीव्हीवर तुमचा शो बघतो, तेव्हा मी खूप हसतो आनंदी असतो. सर तुम्ही खूप ग्रेट आहात. तुमचे काम जास्त कठीण आहे. तुम्ही माझ्यासाठी तर जीवनदाता आहात”. या मेसेजनंतर गौरव मोरेने त्याला मेसेजला उत्तर देताना त्याच्या स्किटमधील अतिशय प्रसिद्ध संवाद लिहिले आहेत. त्यात त्याने लिहिले, “खूप प्रेम सर, टानानाना, मरतो का काय मी, फ्रेश, जाम बेकार क्रिएटिव्हिटी, तुमच्या हिंदी शायरी म्हणजे…थॅंक्यू सर लव्ह यू”.
या मेसेजचा फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर करताना गौरव मोरेने त्या फॅनला धन्यवाद म्हटले आहे. कलाकारांची खरी संपत्ती त्यांची फॅन्सचं आहे. आतापर्यंत महाराष्ट्राची हास्यजत्रा या टीमच्या कलाकारांना अशा फॅन्सच्या प्रेमाची अनुभूती अनेकदा आली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
जेव्हा मुलाखतीत रणबीर कपूर म्हणाला होता, ‘दीपिका माझ्यासाठी दाल चावलसारखी होती…’
इंजिनिअरिंग सोडून ‘या’ कलाकारांनी अभिनयात आजमावले नशिब, आज आहेत बॉलिवूडचे स्टार