Wednesday, July 3, 2024

दुबईमध्ये हास्यजत्रेला मिळालेले प्रेम पाहून गौरव मोरे झाला भावुक म्हणाला, ‘…त्याचं ऋण कसं फेडावं…?’

महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हसवून हसवून वेड लावणारा शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. या शोने लोकांना हसवण्याचा वसा हाती घेतला असून, ते त्यानुसार सर्वांना हसवण्याचा काम करत आहे. आज महाराष्ट्राची हास्यजत्रा आणि या जत्रेतील सर्वच कलाकार संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले असून, त्यांना तुफान फॅन फॉलोविंग देखील आहे. घरातील प्रत्येक पिढीचा आवडता कार्यक्रम म्हणून या शो ने नावलौकिक मिळवला आहे. या शो चे फॅन भारताबाहेर देखील असल्याने शोच्या निर्मात्यांनी या कार्यक्रमातील कलाकरांना घेऊन दुबई गाठली आहे. दुबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर मराठी प्रेक्षक असल्याने या शो ला तिथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुबईमधील प्रेक्षकांनी हास्यजत्रेच्या कलाकारांना दिलेला प्रतिसाद पाहून हे सर्वच कलाकार भारावून गेले.

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाला दुबईत तुफान प्रतिसाद मिळाला आणि सोबतच कलाकारांना अमाप प्रेम देखील मिळाले. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अभिनेता गौरव मोरेने एक खास पोस्ट फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टसोबत त्याने त्याचा दुबईमधील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये गौरव स्टेजवर उभा असून, समोर प्रचंड मोठा प्रेक्षकवर्ग बसलेला दिसत आहे. तो येताच प्रेक्षकांनी “गौरव गौरव” असा जल्लोष देखील केला. याबद्दल गौरवने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले,”एक कलाकार म्हणून अजून काय पाहिजे….? मला फार बोलता येत नाही. पण तुम्ही माझ्यावर जे प्रेम केलंत, करताय त्याचं ऋण कसं फेडावं…? हे काही मला सूचत नाहीये…फ़क़्त एवढच बोलू शकतो…मायबाप प्रेक्षकहो खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद दुबई…love you”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

सध्या गौरवाची ही पोस्ट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, त्याची चांगलीच चर्चा रंगलेली दिसत आहे. पवई फिल्टरपाडामध्ये राहणाऱ्या गौरवला या कार्यक्रमातून जगभर ओळख मिळाली. गौरवने मराठीसोबतच ‘संजू’, ‘कामयाब’, ‘झोया फॅक्टर’ आदी हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘आपल्या मुलांना मोठे होताना पाहणे…’ रवीना टंडनने लिहिली मुलगी राशासाठी खास पोस्ट

चार दिन की चांदनी! गौतमी पाटीलवर मेघा घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘सगळ्या मर्यादा…’

हे देखील वाचा