Wednesday, August 13, 2025
Home मराठी ‘…कोणाच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवला’, अभिनेत्री विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

‘…कोणाच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवला’, अभिनेत्री विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

कलाकार आणि सोशल मीडिया यांचे नाते खूपच अनोखे आणि खास आहे. कलाकार नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करत फॅन्सच्या संपर्कात असतात. कलाकार आणि त्यांच्या पोस्ट या मीडियामध्ये देखील चर्चेत येतात. अनेकदा कलाकार अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या मनातील विविध भावना व्यक्त देखील करताना दिसतात. मग त्या कामासंबंधी असो किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असो. कलाकारांच्या अशा पोस्टवरून अनेक चर्चा मीडियामध्ये आणि फॅन्सच्या गोटात रंगताना दिसतात. मराठी मनोरंजनविश्वातील हरहुन्नरी अभिनेत्री आणि विनोदाची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री विशाखा सुभेदाराने देखील एक पोस्ट केली असून, ती सध्या या पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून विशाखाने तुफान लोकप्रियता मिळवली. नुकतीच विशाखाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत, कोणता अनुभव व्यक्त केला आहे की, अजून काही हे तिच्या फॅन्सला समजतच नाही. विशाखाने तिचा एक व्हिडिओ शेअर केला असून, या व्हिडिओला कॅप्शन देताना तिने जे लिहिले आहे, ते सध्या चांगलेच गाजत असून, त्यावरून अनेक चर्चाना उधाण आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

विशाखाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “जरुरत, गरज …किती खरी किती खोटी? पण तोंडदेखल्या म्हणणं हे कळतच की आपल्याला उशिरा का होईना..गरज सरो वैद्य मरो अशाच्या समवेत फार काळ राहू नये आणि नंतर आपलं आपल्याला हसू येतं की किती मूर्ख होतो आपण.. कोणाच्या बोलण्यावर आपण विश्वास ठेवला.” यासोबत तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती ‘जरुरत थे हम या जरूरी है तुमको’ या गाण्यावर लिपसिंक करताना दिसत आहे. यात तिचा अंदाज, तिचे एक्सप्रेशन खरंच पाहण्यासारखे आहे.

विशाखाने ‘फु बाई फु’, महाराष्ट्राची हास्यजत्रा, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून एक विनोदी अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. विशाखा सुभेदार यांनी आतापर्यंत ‘फक्त लढ म्‍हणा’, ‘४ इडियट्स’, ‘अरे आवाज कोनाचा’ आदी अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले असून, सध्या त्या कुर्रर्र या नाटकात काम करत आहे. याशिवाय ती अनेक टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये देखील दिसत असते. विनोदी भूमिकांसह विशाखा खलनायकी भूमिका देखील उत्तम साकारते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कधीकाळी नाना पाटेकरांसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री आयशा जुल्का, सध्या करते ‘हे’ काम
मधुबाला आधी ‘या’ पाकिस्तानी अभिनेत्रीला ‘अनारकली’ची मिळाली होती ऑफर, जाणून घ्या कोण आहे ‘ती’ अभिनेत्री

 

हे देखील वाचा